सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल बिनविरोध; तर उपमहापौर पदी ज्ञानेश्वरी देवकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:34 IST2026-02-06T12:18:35+5:302026-02-06T12:34:50+5:30

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, भारतीय जनता पक्षाचे विनायक कोंड्याल यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे.

BJP's Vinayak Kondyal elected unopposed as Solapur Municipal Corporation Mayor | सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल बिनविरोध; तर उपमहापौर पदी ज्ञानेश्वरी देवकर

सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल बिनविरोध; तर उपमहापौर पदी ज्ञानेश्वरी देवकर

सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, भारतीय जनता पक्षाचे विनायक कोंड्याल यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर् उपमहापौर पदी ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड झाली आहे. विरोधी पक्षांनी आपले अर्ज मागे घेतल्याने कोंड्याल यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. 

महापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला होता. भाजपचे विनायक कोंड्याल यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) कडून प्रियदर्शन साठे आणि एमआयएम (MIM) कडून तौफिक हात्तुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे निवडणूक होणार की काय? अशी चिन्हे दिसत होती.

मात्र, ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलली आणि शिवसेना तसेच एमआयएम या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. दोन प्रमुख प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी विनायक कोंड्याल यांची अधिकृत घोषणा केली.

या बिनविरोध निवडीमुळे महायुतीमधील समन्वय दिसून आला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा राजकीय विजय मानला जात आहे.

Web Title : सोलापुर: भाजपा के कोंड्याल निर्विरोध महापौर, देवकर उपमहापौर निर्वाचित

Web Summary : भाजपा के विनायक कोंड्याल सोलापुर के निर्विरोध महापौर चुने गए, क्योंकि विरोधियों ने नाम वापस ले लिया। ज्ञानेश्वरी देवकर उपमहापौर हैं। यह जीत सोलापुर नगर निगम में भाजपा के प्रभुत्व को मजबूत करती है, जो महायुति गठबंधन के भीतर मजबूत समन्वय का संकेत है।

Web Title : Solapur: Kondyal of BJP Unopposed as Mayor, Devkar as Deputy

Web Summary : BJP's Vinayak Kondyal elected Solapur Mayor unopposed after opponents withdrew. Gyaneshwari Devkar is Deputy Mayor. This victory reinforces BJP's dominance in the Solapur Municipal Corporation, signaling strong coordination within the Mahayuti alliance.