मोठी बातमी; अखेर भोंदूबाबा मनोहरमामा भोसले करमाळा पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 16:34 IST2021-09-19T16:32:05+5:302021-09-19T16:34:30+5:30
सोमवारी कोर्टात हजर करणार

मोठी बातमी; अखेर भोंदूबाबा मनोहरमामा भोसले करमाळा पोलिसांच्या ताब्यात
करमाळा : अखेर मनोहरमामा भोसलेचा ताबा बारामती न्यायालयाने करमाळा पोलीसांना दिला आहे. दुपारी 1 वाजता भोसले ताब्यात मिळाल्यावर पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या टिमने मनोहरमामाला करमाळयाकडे दुपारी 3 वा. आणले त्याची वैद्यकीय तपासणी येथील उपजिल्हा रुग्णालयात केल्यानंतर त्यानंतर मनोहरमामाची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी मनोहरमामाला करमाळा यायालयासमोर उभे केले जाणार आहे
करमाळा पोलीस कार्यालयात 9 सप्टेंबरला मनोहरमामा भोसले व याचे दोन साथीदार विरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच दिवशी बारामती पोलीसातही फसवणूक व बुवाबाजी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान 10 सप्टेंबरला पुणे एल सी बी पोलीसांनी सालपे ता.लोणंद, जि.सातारा येथील एका फार्म हाऊस वर लपून बसलेल्या भोसलेला ताब्यात घेतले व बारामती पोलीसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर भोसलेला प्रथम पाच दिवस व नंतर तीन पोलीस कोठडी दिली होती.
बारामती न्यायालयाची आज(ता.19) मनोहरमामा भोसले ची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे स्वतः बारामती न्यायालयात गेले होते. त्यांनी करमाळा पोलीसात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपासकामी मनोहरमामा भोसलेची मागणी केली. त्यानुसार बारामती न्यायालयाने मान्यता दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस उपनिरिक्षक साने, पोलिस देवकर, ढवळे, पवार आदी सहकार्यानी मनोहरमामा भोसले यास करमाळयात आणले. त्याची वैद्यकीय तपासणी येथील उपजिहा रूणालयात करून त्याची जेलमध्ये रवानगी केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ. विशाल हिरे उपस्थित होते. सोमवार द (ता.20) करमाळा येथील न्यायालयात मनोहरमामा भोसले ला हजर केले जाणार असुन न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे अशी माहीती उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ. विशाल हिरे यांनी दिली.