भोसरे येथील बागल वस्तीवर सशस्त्र दरोडा; पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 13:13 IST2021-10-05T13:13:27+5:302021-10-05T13:13:33+5:30
कुर्डूवाडी : भोसरे (ता. माढा ) येथील बागल वस्तीतील तीन तर जवळच असणाऱ्या महावितरणच्या पाठीमागील दोन घरे असे एकूण पाच ...

भोसरे येथील बागल वस्तीवर सशस्त्र दरोडा; पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
कुर्डूवाडी : भोसरे (ता.माढा) येथील बागल वस्तीतील तीन तर जवळच असणाऱ्या महावितरणच्या पाठीमागील दोन घरे असे एकूण पाच घरांवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात आठ ते दहा सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला करुन लूटमार केली आज. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वा. च्या सुमारास घडली.
यामध्ये दरोड्यात नेमके त्या विविध घरातील किती सोने व रोख रक्कम गेली आहे याबाबत अद्यापही माहिती मिळू शकलेली नाही. यामध्ये मात्र दत्तात्रय बागल हे जखमी झाले असून त्यांच्यावर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळाला ग्रामीण पोलिस दलाच्या अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी भेट दिली असून घटनास्थळी श्वानपथकांना पाचारण करण्यात आले आहे.याबाबत कुर्डुवाडी पोलिसांची विविध पथके आरोपींना शोधण्यासाठी रवाना झाली आहेत. सदर घटनेची नोंद घेण्याचे काम पोलिसांत सुरु आहे.
भोसरे येथील दरोडा पडलेल्या संबधीत घरांना मी भेटी दिल्या असून घटनास्थळी पाहणी केली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांची विविध पथके तयार केली असून ती लवकरच संशियतापर्यत पोहचतील.मात्र सर्व नागरिकांनी तोपर्यंत सतर्क राहावे.
तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर