अक्कलकोट शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख याेगेश पवार यांची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी
By Appasaheb.patil | Updated: October 28, 2022 14:42 IST2022-10-28T14:41:30+5:302022-10-28T14:42:20+5:30
ठाकरे गटाला मोठा धक्का

अक्कलकोट शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख याेगेश पवार यांची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी
सोलापूर : अक्कलकोटशिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार यांचा पक्षपदाचा व शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अक्कलकोट तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार व पदाधिका-यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पक्षपदाचा व पक्ष सदसत्वाचा राजीनामा दिला. अडीच वर्षापासून कोणतेच काम न झाल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्ष पदाचा राजीनामा दिला आहे असे संजय देशमुख म्हणाले. लवकरच बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत व शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच प्रवेश करणार आहेत असे सांगण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे दिलीप कोल्हे हे देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले.