Breaking; पुण्याजवळ अपघात; अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गीचे पाच जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 15:38 IST2020-09-21T15:34:51+5:302020-09-21T15:38:12+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

Breaking; पुण्याजवळ अपघात; अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गीचे पाच जण ठार
सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ कंटनेर व कारच्या झालेल्या अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली़ या अपघातील मयत पाच जण हे मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मैंदर्गी (अक्कलकोट) येथील एका कुटुंबातील लोक पुण्याहून सोलापूरच्या दिशेने येत होते़ यावेळी भरधाव वेगात असलेल्या कारसमोर असलेल्या कंटेनरने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणारी सेंट्रो कार कंटेनरला धडकली. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत़ अपघातातील मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. या अपघाताची नोंद यवत पोलिस ठाण्यात झाली आहे.