भोसरे शिवारात अपघात; तरूणाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 14:56 IST2020-01-27T14:55:53+5:302020-01-27T14:56:54+5:30

अज्ञात वाहनाची धडक; मयत तरूण वडाचीवाडीचे सरपंचाचा पुतन्या

Accident in Bhosare Shivar; Death of a young man on the spot | भोसरे शिवारात अपघात; तरूणाचा जागीच मृत्यू

भोसरे शिवारात अपघात; तरूणाचा जागीच मृत्यू

ठळक मुद्दे- माढा रस्त्यावरील भोसरे हद्दीत झाला अपघात- अपघातानंतर अज्ञात वाहन व चालक पसार- वडाचीवाडी परिसरात शोककळा

कुर्डूवाडी : माढा रस्त्यावरील भोसरे हद्दीत १९ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना  रविवारी रात्री सव्वा आठच्या दरम्यान घडली आहे. माऊली मोहन ढेकळे ( वय १९, रा वडाचिवाडी, ता माढा) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत नामदेव रामा लोभे ( रा वडाचीवाडी, ता माढा) यांनी कुडुर्वाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव लोभे हे कुर्डूवाडीहुन वडाचीवाडीकडे गावी जात असताना भोसरे शिवारात काम सुरु असलेल्या पुलाजवळ माऊली ढेकळे हा जखमी युवक व त्याची दुचाकी ( एम एच १३ एएम २६१८) पडलेली दिसली. अज्ञात वाहनाच्या चालकाने भरधाव वेगात, हयगयीने गाडी चालवून त्याला जोराची धडक देऊन वाहनासह पळून गेल्याचे त्याला दिसले.

माऊलीच्या अंगावरुन गाडी गेल्याने त्याच्या डोक्यास, पोटास  मार लागुन जखमी झाला व त्यातच मृत्यू त्याचा झाला. या घटनेमुळे वडाचीवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. माऊली ढेकळे हा वडाचीवाडीचे सरपंच शिवाजी ढेकळे यांचा पुतन्या होता.


 

Web Title: Accident in Bhosare Shivar; Death of a young man on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.