Viral Video: ही दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात, नंदुरबारमध्ये धबधब्यावर पर्यटकांसोबत असं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 11:59 IST2025-07-10T11:57:17+5:302025-07-10T11:59:34+5:30
नंदुरबार जिल्ह्यात एका धबधब्यावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने अनेक पर्यटक अडकून पडल्याचा व्हिडीओ समोर आला.

Viral Video: ही दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात, नंदुरबारमध्ये धबधब्यावर पर्यटकांसोबत असं काय घडलं?
नंदुरबार जिल्ह्यात एका धबधब्यावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने अनेक पर्यटक अडकून पडल्याचा व्हिडीओ समोर आला. परिस्थिती इतकी बिकट झाली की, लोकांचे बाहेर पडणे खूप कठीण झाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक लोकांनी बचाव पथकाची वाट न पाहता लोकांना वाचवायला सुरुवात केली आणि सर्वांना सुखरूप बाहेर काढली.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील एका प्रसिद्ध धबधब्यावर काही पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आले. परंतु, दुपारी अचानक हवामान बदलले आणि धबधब्याला पूर आला. पाण्याचा प्रवाह वाढल्याने अनेक पर्यटक त्यात अडकले. अशा परिस्थितीत स्थानिक लोकांनी विलंब न करता पर्यटकांची मदत करायला सुरुवात केली. पर्यटकांना बाहेर काढताना त्यांना अनेक अडचणी येत होत्या. परंतु, तरीही गावकऱ्यांनी हिंमत सोडली नाही.
A sudden flash flood at a waterfall in Maharashtra's Nandurbar district triggered panic among tourists after a powerful surge of water caught them off guard. Rescue teams responded swiftly, pulling everyone to safety.#Maharashtra#Nadurbar#Flood#HeavyRain#Rain#ABPLivepic.twitter.com/LjmiTodFBJ
— ABP LIVE (@abplive) July 10, 2025
प्रशासन आणि बचाव पथसु घटनास्थळी पोहोचेपर्यंत सर्व अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सुदैवाने, या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जर स्थानिक लोकांनी तातडीने मदत केली नसती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. या बचावकार्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले आहे.