महाराष्ट्र निवडणूक निकाल : सावंतवाडीत दीपक केसरकरच 'भाई'! तेलींचे आव्हान मोडत साधली विजयाची हॅटट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 15:07 IST2019-10-24T15:05:39+5:302019-10-24T15:07:45+5:30
शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील गृह आणि वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दणदणीत विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे.

महाराष्ट्र निवडणूक निकाल : सावंतवाडीत दीपक केसरकरच 'भाई'! तेलींचे आव्हान मोडत साधली विजयाची हॅटट्रिक
सावंतवाडी: संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता लागून राहिलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी 13 941 मतानी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील गृह आणि वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दणदणीत विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र कणकवलीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध शिवसेनेकडून एबी फॉर्म देण्यात आल्याने कुडाळ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपने अपक्ष उमेदवार पुरस्कृत केले होते हे अपक्ष उमेदवार असले तरी भाजपने महाराष्ट्र व गोव्यातील नेत्यांची पाऊस या दोन उमेदवारांना मागे उभी केली होती त्यामुळे ही लढाई इ शिवसेना विरुद्ध भाजप अशीच होती त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते सकाळपासूनच येथील तहसीलदार कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली वेंगुर्ला तालुक्याचे पहिली केंद्र मोजणीसाठी घेण्यात आले त्यात तेली व शिवसेनेचे केसरकर याच्यात चांगलीच चुरस दिसून आली.
प्रत्येक मतदान केंद्रावर शिवसेना उमेदवार दीपक केसरकर हे नेहमीच्या तुलनेत हजार किंवा पाचशे मताने आघाडी घेत होते त्यामुळे मोठे मताधिक्य केसरकर यांना मिळणार नाही हे जवळपास निश्चित झाले होते. वेंगुर्ला तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर केसरकर यांना ताधिक्य मिळाले असले तरी सावंतवाडी तालुक्यातील बहुतांशी मतदान केंद्रांवर तेली यांना मताधिक्य मिळाले आहे दोडामार्ग तालुक्यात अपेक्षेप्रमाणे केसरकर यांनीच बाजी मारली आहे त्यामुळे 24 फेरया अखेर केसरकर हे 13 941 मताधिक्याने निवडून आले आहेत