Kudal Speaker Nutan Iyer joins BJP | कुडाळ सभापती नूतन आईर यांचा भाजपात प्रवेश

 कणकवली येथे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ पंचायत समिती सभापती नूतन आईर यांनी भाजपात प्रवेश केला.

ठळक मुद्देकुडाळ सभापती नूतन आईर यांचा भाजपात प्रवेशशिवसेनेला झटका; नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत

कणकवली : कुडाळ पंचायत समिती सभापती नूतन आईर व रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला.आमदार नितेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. सभापती नूतन आईर यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला एकप्रकारे झटका बसला आहे.

गेले काही दिवस कणकवली तालुक्यातील शिवसैनिक भाजपात प्रवेश करत असतांनाच गुरुवारी कुडाळ सभापती नूतन आईर यांनी राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केल्याने शिवसेनेला फार मोठा धक्का बसला आहे. कणकवली येथील ओम गणेश या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी हा भाजपामध्ये प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई,माजी नगराध्यक्ष विनायक राणे,महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, भाजपा युवा प्रवक्ता दादा साईल,दीपक नारकर,राकेश कांदे, कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे,राजन चिके,सोनू सावंत,संदीप सावंत,अरविंद परब,पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, सर्वेश वर्दम,सुनील बांदेकर,पप्या तवटे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Kudal Speaker Nutan Iyer joins BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.