Shivaji Maharaj Statue Collapse: पुतळा दुर्घटनेची संयुक्त चौकशी समितीकडून पाहणी, दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:23 IST2024-09-05T13:22:52+5:302024-09-05T13:23:16+5:30
प्रसारमाध्यमांनाही ठेवले दूर

Shivaji Maharaj Statue Collapse: पुतळा दुर्घटनेची संयुक्त चौकशी समितीकडून पाहणी, दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता
मालवण (सिंधुदुर्ग) : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने बुधवारी मालवण राजकोट येथे येऊन पाहणी केली. याबाबत शासकीय यंत्रणेने कमालीची गुप्तता पाळली होती.
मालवण मेढा, जयगणेश मंदिर ते राजकोट हा संपूर्ण परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीस जाण्याची परवानगी दिली जात नव्हती, तर सोबत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोबाइल जमा करण्यात आले होते. प्रसारमाध्यमांना देखील या पाहणी दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आले.
भारतीय नौदल आणि महाराष्ट्र शासनाने संयुक्त चौकशी समिती स्थापन केली आहे. भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्य समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश आहे. समितीसोबत जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, आदी अधिकारी उपस्थित होते.