
रायगड समुद्रात मासेमारी करणारी बोट बुडाली, बचावकार्य सुरू!
रायगडच्या उरण करंजा समुद्रात मासेमारी बोट बुडाली. गुजरातची बोट असल्याची माहिती. CISF आणि नौदलाच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. अपघाताचे कारण आणि नुकसानीचा तपशील अजून अस्पष्ट आहे. अधिक तपास सुरू!

राष्ट्रीय: वर्षाखेरीस 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर बाजारात येणार: मोदींची मोठी घोषणा
पंतप्रधान मोदींची घोषणा, 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप्स लवकरच बाजारात! भारत ६जी तंत्रज्ञानावर वेगाने काम करत आहे. 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत सेमीकंडक्टर, स्पेस आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्समध्ये भारत जागतिक स्तरावर मोठी झेप घेत आहे. मेक इन इंडिया यासारख्या योजनांद्वारे मजबूत पाया घातला आहे. आता ६जी आणि सेमिकंडक्टरसारख्या क्षेत्रात पुढे जाणे हे व्हिजन २०४७ च्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे असं मोदी म्हणाले.

महाराष्ट्र: 'माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय?'; सुप्रिया सुळेंच्या मांसाहारवरील विधानानं वाद
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मांसाहारावरून केलेल्या विधानावर वाद निर्माण झाला आहे. 'मी खाते ते माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम असं विचारत सुळेंनी मागील व्हायरल व्हिडिओवर भाष्य केले. नेमकं कुठे जेवायला गेले, तेवढेच व्हायरल केले. खाल्लं खाल्लं त्यात काय पाप केले का? उघड खाते फक्त माळ घालत नाही. खाण्याचा मोह होतो म्हणून घालत नाही बाकी काही प्रॉब्लेम नाही असं त्या म्हणाल्या.

राष्ट्रीय: Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला
'साहेब, माझी पत्नी मुलगा आणून दे म्हणतेय. माझ्या मुलाला जिवंत करा नाही, तर दोषींना शिक्षा द्या', नवजात मुलांचा मृतदेह घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या एका बापाच्या मागणीने संपूर्ण प्रशासन हादरले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यात ही घटना घडली. डॉक्टरांनी पैशांमुळे वेळेवर उपचार केले नाही आणि मुलाचा गर्भातच मृत्यू झाला, असा आरोप बापाने केला.

महाराष्ट्र: नुकसानीची सवय करा, भाजपा नेते पाशा पटेलांचा शेतकऱ्यांना अजब सल्ला
भाजपा नेते पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना नुकसानीची सवय करण्याचा सल्ला दिला. हवामान बदलामुळे वारंवार नुकसान होईल. वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३२२ दिवस शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. सरकार फक्त मदत करू शकते, भरपाई नाही, असे ते म्हणाले. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी या विधानावर टीका करत सरकारी धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महाराष्ट्र: आशिया कप स्पर्धेवरुन राऊतांचे मोदींना पत्र; भारत-पाक सामन्यावर प्रश्न
संजय राऊतांनी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर आक्षेप घेत मोदींना पत्र लिहिले. पहलगाम हल्ल्याचा हवाला देत, हा शहीदांचा अपमान असल्याचे म्हटले. 'ऑपरेशन सिंदूर' पूर्ण झाले नसताना सामना कसा? भाजपला यात फायदा होतो का, असा सवाल राऊतांनी केला.

सखी: विराट कोहली सांगतोय ४ फिटनेस टिप्स, बदलून जाईल जगणं
विराट कोहली म्हणजे फिटनेसचे आदर्श उदाहरण. त्याची एनर्जी आणि पॅशन हे वादातीत असलं तरी त्या वाटेनं चालणं अगदीच काही अवघड नाही. महिला आणि पुरुष दोघांसाठी त्यानं दिलेल्या फिटनेस टिप्स अत्यंत अनुकरणीय आहेत. चार गोष्टी बदलून टाकू शकतात जगणं सगळ्यांचंच..

आंतरराष्ट्रीय: भारताचे समर्थन करणाऱ्या जॉन बोल्टन यांच्या घरावर FBI ची धाड
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेल्या जॉन बोल्टन यांच्या घर आणि कार्यालयावर अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा आणि एफबीआयने धाडी टाकल्या. गोपनीय कागदपत्रांचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर असून, याच प्रकरणात ही झाडाझडती घेण्यात आली. मात्र, यांचा संबंध टॅरिफ धोरणावरील टीकेशीही लावला जात आहे.

सखी: गणपती आगमन जवळ आलं, पूजेसाठी ही घ्या परिपूर्ण यादी!
गणेश चतुर्थी जवळ येऊन ठेपली आहे. कितीही तयारी केली तरी अमूक हाताशी नाही, तमूक सापडत नाही असं घाईगडबडीत होऊच शकतं. त्यामुळे पूजेचं सर्व साहित्य यादी हाताशी हवीच. यादीप्रमाणे करा तयारी आणि अजिबात धावपळ न करता निवांत प्रसन्न पूजा करा. आताच तयारीला लागा.

राष्ट्रीय: टिकटॉकवरील बंदी हटवण्याचे आदेश काढला नाही, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
भारतात टिकटॉक पुन्हा सुरू होणार असल्याचे रिपोर्ट समोर आले आहेत. हे रिपोर्ट केंद्र सरकारने फेटाळून लावले आहेत. टिकटॉकवरील बंदी हटवण्यासंदर्भात सरकारने कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असे सरकारमधील सूत्रांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

सखी: ऑनलाईनस्वस्त कपडे खरेदी करणं पडलं महागात, महिलेचा भयंकर अनुभव
ऑनलाइन शॉपिंग हल्ली सगळेच करतात. ते सोयीचेही असते. पर्यायही अनेक उपलब्ध असतात. वेळ वाचतो. मात्र ब्रिटनमध्ये एका महिलेनं स्वस्त शेपवेअर ऑनलाइन खरेदी केले. मात्र ते घालून पार्टीला गेल्यावर कंबर आणि मांडीची आग व्हायला लागली. इजाही झाली. तक्रार केल्यावर किरकोळ नुकसान भरपाई दिली, मात्र असे का झाले याचे कारण मोठे गंभीर आहे.

सखी: रडू आलं की चेहरा गार पाण्यानं धुवावासा का वाटतो?
रडू आलं, डोळ्यातून पाणी आलं की शरीरातले स्ट्रेस निर्माण करणारे हार्मोन स्त्रवतात. रडून झालं की ते कमी होतात. नर्व्हस सिस्टिम शांत होते. ताण कमी होतो, मूड सुधारुन हलकं ही वाटतं. त्यामुळे रडल्यानंतर आपण चेहरा धुतो. त्याचा मानसिक आरोग्याशीही संबंध आहे.

सखी: वय वाढल्यावर गर्भधारणेत अडचणी का येतात? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची कारणं
प्रत्येकीचं एक बायॉलॉजिकल क्लॉक असते, वय वाढत जातं तशी महिलांची प्रजनन क्षमता घटते. पीसीओडी आणि हार्मोनल समस्याही गर्भधारणेत अडसर निर्माण करतात. आयव्हीएफचा पर्याय असला तरी शंभर टक्के यशाची खात्री नसते. प्रेशियस प्रेंगनंन्सी मानली जात असली तरी तिशीनंतरचं गरोदरपण महिलेसाठी सोपं नसतं, त्याची अनेक कारण आहेत.

पुणे: पालकमंत्री नसतानाही कामं सुरू; भुजबळ, गोगावलेंना अजितदादांचा टोला!
नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून काही मान्यवर आमचे इतके आमदार आहेत, असा दावा करतात. मात्र, कोणालाही काही विचारण्याची गरज नाही. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. पालकमंत्री नसतानाही या जिल्ह्यांची कामे सुरळीत सुरू आहेत. असे सांगत स्वपक्षीय मंत्री छगन भुजबळ यांनाही अप्रत्यक्ष टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

व्यापार: HDFC बँकेचा धमाका! एकावर एक बोनस शेअर; गुंतवणूक फायद्याची?
HDFC बँक देणार एकावर एक बोनस शेअर देण्याच्या तयारी आहे. यासाठी येत्या आठवड्याची रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आलीये. गुंतवणूक करावी का? तज्ञांच्या मते, शेअर २०५० पर्यंत जाण्याची शक्यता. पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट.

राष्ट्रीय: जगदीप धनखड यांचा पत्ता लागला! महत्त्वाची माहिती आली समोर
जगदीप धनखड यांचा ठावठिकाणा कुठे आहे, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांचे नेते करत असतानाच, माजी उपराष्ट्रपती हे टेबल टेनिस खेळण्यात व्यस्त आहेत. ते नियमितपणे योगाभ्यास करत आहेत, अशी माहिती त्यांच्या जवळच्या लोकांनी दिली.

पुणे: अखेर वाद मिटला! पुण्याची विसर्जन मिरवणूक पूर्वीप्रमाणे होणार
पुण्यात मागील काही दिवसांपासून गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेबाबत निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्किट हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चर्चेनंतर सकाळी साडेनऊ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. मिरवणूक वेळेत पार पडावी, यासाठी काही महत्त्वाचे नियम ठरवण्यात आले आहेत. स्थिर वादन होणार नाही, मिरवणूक थांबणार नाही आणि दोन मंडळांमधील अंतर व्यवस्थित राखले जाईल.

सखी: व्हिटामिन ‘डी’ची कमतरता म्हणजे आजारांना आमंत्रण
व्हिटामिन डी सूर्यप्रकाशातूनच मिळतं हे आपण शाळेतच शिकलो. पण तरी त्याची औषधे घ्यावी लागतात. त्याची डेफिशियंसी अनेकांना छळते. त्यामुळे कधी, कितीवेळ सूर्यप्रकाशात बसले तर भरपूर व्हिटामिन डी मिळेल? किमान १५ मिनिटे तरी कोवळ्या सूर्यप्रकाशात बसल्यास फायदा होतो. पण ते कसं करायचे याचेही काही नियम आहेत.

मुंबई: हरित इंधनात रूपांतरासाठी बेकरींना मुदतवाढ नाही- उच्च न्यायालय
मुंबईतील लाकूड व कोळसा वापरणाऱ्या बेकरींना दणका बसला. १२ बेकरींना गॅस, वीज किंवा अन्य हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. प्रदूषण आणि सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचे असल्याचे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळली.

महाराष्ट्र: फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर खलबते; महायुतीत समन्वयावर चर्चा, निवडणुकांवर लक्ष!
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात महायुती समन्वय आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील राधाकृष्णन यांच्या समर्थनावर चर्चा झाली. आगामी निवडणुका एकत्रित लढण्यावर एकमत झाले. महामंडळ नियुक्त्या लवकरच करण्याचा निर्धार व्यक्त केला. मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यावरही भर देण्यात आला.

नवी मुंबई: गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर दर १५ किमीवर सुविधा केंद्र
गणेशोत्सवासाठी कोकणातील जाणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र उभारणार आहेत, तर २३ ठिकाणी रुग्णवाहिका तैनात आहेत. २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान ५ हजार बसची व्यवस्था केली आहे.

मुंबई: फडणवीस-राज ५५ मिनिटे भेट; दया कुछ तो ‘राज’ की बात है...!
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट राजकीय चर्चेला खाद्य पुरविणारी ठरली. या दोन नेत्यांमध्ये तब्बल ५५ मिनिटे दीर्घ चर्चा झाली. एवढा वेळ केवळ चांगले रस्ते आणि पार्किंग जागांच्या नियोजनासाठी खर्ची केला, यावर विश्वास तरी कसा ठेवणार? काहीजण या बैठकीचे वर्णन दया कुछ तो ‘राज’ है, असे करीत आहेत.

गोवा: गोवा ही पवित्र भूमी आहे: सचिन तेंडुलकर
गोवा ही पवित्र भूमी आहे. मी गोव्यात जाणार, असे आईला सांगितल्यावर आईने गोव्यातील मंदिराना भेट देऊन देवाचे आशीर्वाद घ्यायला सांगितले, असे सचिनने सांगितले. गोव्यातील श्री मल्लिकार्जुन विद्यालयातील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यात सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता.

मुंबई: प्रवाशांचा हालअपेष्टा पाहून वेदना होतात; हायकोर्टाची तीव्र नाराजी
वांद्रे स्थानक ते म्हाडा कार्यालय स्कायवॉक १५ महिन्यांत बांधण्याची हमी देऊनही मुंबई महापालिकेने कामात दिरंगाई केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का करू नये, असा सवाल न्यायालयाने केला.

महाराष्ट्र: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी SIT स्थापन, मागणीला यश
पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार, औरंगाबाद खंडपीठाने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

महाराष्ट्र: मराठा आरक्षण: मंत्रिमंडळ उपसमिती पुनर्रचना, विखे-पाटील अध्यक्ष
मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना करण्यात आली. राधाकृष्ण विखे-पाटील अध्यक्ष असून, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव-पाटील आणि बाबासाहेब पाटील यांचा समितीत समावेश आहे.

राष्ट्रीय: इस्रोचा नवा विक्रम घडवणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक उभारणार
इस्रो २०३५ पर्यंत स्वदेशी अंतराळ स्थानक बनवणार. पहिले मॉड्यूल २०२८ मध्ये लॉन्च करण्यात येईल. हे स्थानक पर्यटनाला चालना देईल आणि वैज्ञानिक संशोधनाचे केंद्र असेल. BAS चे पहिले मॉड्यूल LVM-३ रॉकेटद्वारे लाँच केले जाईल, जे भारताचे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. यानंतर आणखी चार मॉड्यूल जोडले जातील जे २०३५ पर्यंत संपूर्ण स्टेशन तयार करतील.

राष्ट्रीय: भाजपाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष कधी मिळणार, विलंबामागचं कारण काय..?
भाजपा अध्यक्षपदासाठी पक्षातील वरिष्ठ नेते सातत्याने चर्चा करत आहेत. आरएसएस आणि भाजपा वरिष्ठ नेत्यांमध्येही अध्यक्षपदासाठी जवळपास १०० हून अधिक नेत्यांशी चर्चा झाली आहे. मात्र जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक लागली. येत्या ९ सप्टेंबरला उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे. त्यानंतर बिहार निवडणुकीच्या तारखा घोषित होण्यापूर्वी भाजपाला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय: ऑनलाईन फॅन्टसी गेमिंगवर बंदी; राष्ट्रपती मुर्मूंची विधेयकाला मंजुरी
लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर या ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन विधेयकाला आज अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच, आता या ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणाऱ्या या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. दोषी आढळल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

क्राइम: इंजिनिअरच्या घरी धाड, ३५ लाख, सोन्याची बिस्किटे जप्त, २० लाख आगीत जाळले
बिहारच्या ग्राम विकास विभागात काम करणाऱ्या इंजिनिअर विनोद कुमार रायच्या ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने धाड टाकली आहे. यावेळी धाडीत टीमला ३५ लाखांची रोकड आणि २० लाख रूपये जळालेल्या अवस्थेत सापडले. त्याशिवाय कोट्यवधीच्या जमिनीचे कागदपत्रे, १२ हून अधिक बँक डिपॉझिट आणि लाखोंचे सोने चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. विनोद कुमार यांच्या पत्नीने लाखो रुपयांची रोकड जाळण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रीय: ममता बॅनर्जींचे सरकार लवकरच जाणार: कोलकात्यातून मोदींचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकरावर जोरदार टीका केली. 'आता लवकरच तृणमूल काँग्रेसचे सरकार जाणार आणि भाजपचे सरकार येणार. घुसखोरांनाही देशातून पळून जावे लागेल. आम्ही घुसखोरीविरुद्ध मोहीम सुरू केली आहे,' अशी टीका पीएम मोदींनी केली.