
राष्ट्रीय: एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन लँडिंग, हवेत इंजिनला आग, प्रवासी सुखरूप
दिल्ली-इंदूर एअर इंडिया विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्यामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. वैमानिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. प्रवाशांची गैरसोय झाली. एअर इंडियाच्या विमानात वारंवार बिघाड होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्र: सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण: ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळणार, ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांचे स्पष्ट मत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार, ज्यामुळे ते ओबीसीमध्ये समाविष्ट होतील. गरीब व अल्पभूधारक मराठ्यांना लाभ. प्रमाणपत्र प्रक्रिया सोपी, १९६७ पूर्वीचा पुरावा किंवा शपथपत्रावर आधारित आहे. यामुळे मराठ्यांना गरीब किंवा अल्पभूधारकचा लाभ मिळणार आहे.

राष्ट्रीय: अभिनेत्री रान्या रावला DRI ने ठोठावला 102 कोटींचा दंड
सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी बंगळुरुमध्ये तुरुंगवास भोगत असलेली कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिला महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) १०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंगळवारी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात कैद असलेल्या रान्या रावला २,५०० पानांची सविस्तर नोटीस सोपवली.

महाराष्ट्र: हैदराबाद आणि सातारा गॅझेटचा मराठा आरक्षणाशी काय संबंध?
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर हैदराबाद आणि सातारा गॅझेटची चर्चा सुरू झाली आहे. 1901 च्या हैदराबाद गॅझेटनुसार, मराठवाड्यात ३६% मराठा कुणबी होते. सातारा गॅझेट हे जिल्ह्याचे शासकीय राजपत्र आहे. मराठा आरक्षणासाठी कुणबी दाखले मिळवण्यासाठी ह्या गॅझेटमधील नोंदी महत्त्वाच्या ठरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकतो.

महाराष्ट्र: मनोज जरांगेंनी उपोषण सोडले; मराठा आरक्षणावर जीआर निघाला
मराठा आरक्षणावरील जीआरनंतर मनोज जरांगेंनी पाच दिवसांचे उपोषण सोडले. विखे पाटलांनी जरांगे यांना सरबत पाजले. जीआरमध्ये गडबड झाल्यास मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा जरांगेंनी दिला. मागण्या मान्य झाल्याने मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे. तसेच जरांगे यांनी आपण आता हॉस्पिटलमध्ये काही दिवस मुक्काम करणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र: 'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी सांगितलं
मराठा आणि कुणबी एक आहेत हा 58 लाख नोंदणीचा जीआर काढण्यासाठी सरकारने जरांगेंकडे वेळ मागितला आहे. प्रक्रिया किचकट आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. सगेसोयरे प्रकरणी हरकती जास्त असल्याने वेळ लागणार आहे. दरम्यान, आता समाजाचा आपमाण होऊ देऊ नका. तसेच यात कुणी आडवं आलं तरी, हे टिकवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी," असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

महाराष्ट्र: आरक्षणाबाबत ८ मागण्या, ८ आश्वासन; मनोज जरागेंनी केली विजयाची घोषणा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांवर सरकारने जीआर काढण्याचं आश्वासन दिले. जरांगे यांनी केलेल्या ८ मागण्यांवर सरकारने ८ तोडगे काढले. त्याबाबत अंतिम मसुदा तयार करण्यात आला. तो मराठा आंदोलकांसमोर वाचून दाखवला. त्यात सरकारने बहुतेक मागण्या मान्य केल्या. हैदराबाद गॅझेट लागू, कुणबी प्रमाणपत्र मिळणार. आंदोलकांवरील गुन्हे मागे, मृतांच्या वारसांना मदत यासारख्या मागण्यांचा समावेश होता

सखी: भुवयांचे पांढरे केस होतील काळे, लसणाचा सोपा उपाय, पार्लरचा खर्च वाचेल!
स्वयंपाकघरात आढळणारा लसूण जितका आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे, तितकाच आपल्या सौंदर्यासाठी. जर आपल्याही भुवयांचे केस ऐन तारुण्यात पांढरे होत असतील तर महागडे उत्पादने वापरण्यापेक्षा लसणाचा सोपा उपाय करुन पाहा. आठवड्याभरात भुवया होतील काळ्या आणि दाट...

महाराष्ट्र: मराठा आरक्षण: जरांगे-पाटील यांचे आंदोलन थांबले? सरकारसोबत सहमती, जीआरची प्रतीक्षा!
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे-पाटील आणि सरकारमध्ये सहमती होत असल्याचे संकेत आहेत. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी केली जाणार आहे. सातारा गॅझेटियरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे, बलिदानी कुटुंबांना मदत. जीआर निघेपर्यंत आंदोलन स्थगित करण्यास जरांगे यांचा नकार दिला आहे.

सातारा: मराठा आरक्षण आंदोलन: प्रकृती ठीक नसल्याने मुंबईत जाऊ शकलो नाही- उदयनराजे
मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया: प्रकृती ठीक नसल्याने मुंबईत जाऊ शकलो नाही, पण मराठा आरक्षणासाठी नेहमीच धावणार. शासनाने आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढावा, असे आवाहन. जरांगे यांनीही शासनासोबत चर्चा करावी, असे उदयनराजेंनी म्हटले - लोकमत.

व्यापार: इस्त्रोने घडवला इतिहास! पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप तयार!
इस्त्रोने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इस्रोच्या सेमीकंडक्टर लॅबमध्ये तयार झालेल्या 'विक्रम' चिपचे संपूर्ण उत्पादन भारतातच झाले आहे. ही चिप अंतराळ यानांच्या अत्यंत कठीण परिस्थितीत वापरण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे.

सखी: जिद्दीला सलाम! दुःखावर मात करत युट्यूबर भारती म्हात्रेंनी उभा केला व्यवसाय
भारती म्हात्रेची प्रेरणादायी कहाणी! जवळची माणसं गमावली, दु:खावर मात करत तिच्या स्वयंपकाच्या चवीने दिली नवीन ओळख. सुरु केला नवा व्यवसाय

मुंबई: जरांगे पाटलांना सरकारचा एकही प्रतिनिधी भेटला नाही: रोहित पवारांची सरकारवर टीका
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाच दिवस झाले तरी सरकारचा कोणताही प्रतिनिधी भेटायला न आल्याने रोहित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुकांमध्ये मंत्र्यांची रीघ लागायची, आता आंदोलकांना वाऱ्यावर सोडले, असा आरोप त्यांनी केला. सरकारने तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राष्ट्रीय: माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान...; PM नरेंद्र मोदी भावूक, काँग्रेसवर टीका
बिहारमध्ये काँग्रेस आरजेडीच्या मंचावरून माझ्या आईला शिवी दिली. ही वेदना मनाला दु:ख देणारी आहे. प्रत्येक आई आपल्या मुलांना मोठ्या तपस्येने वाढवते. हा केवळ माझ्या आईचा अपमान नाही तर देशातील प्रत्येक आईचा, बहिणीचा, मुलींचा अपमान आहे. माझ्या आईबद्दल ऐकून बिहारच्या प्रत्येक आईला किती वाईट वाटले असेल याची मला जाणीव आहे. माझ्या हृदयात जे दुःख आहे तेच दुःख बिहारच्या लोकांनाही आहे असं त्यांनी सांगितले.

सखी: पोट-मांड्या कमी करण्यासाठी या डाळीचं पाणी! वजन घटेल-गॅसेसचा त्रास दूर
पोट आणि मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी हिरव्या मुगाच्या डाळीचं पाणी प्या! फायबरयुक्त डाळ चयापचय सुधारते, आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते. गॅस आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवा!

आंतरराष्ट्रीय: मोदी-पुतीन-जिनपिंग भेटीवर पीटर नवारोंची टीका
डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी मोदी, पुतीन, जिनपिंग यांच्या भेटीवर टीका केली आहे. ही भेट 'त्रासदायक' असल्याचे ते म्हणाले. मोदींनी रशियाऐवजी अमेरिका, युरोप आणि युक्रेनसोबत असणे अपेक्षित आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सखी: ढेकर येऊन त्रस्त आहात? 'हा' उपाय करा आणि मिळवा झटपट आराम
वारंवार ढेकर येऊन हैराण झालात? न्युट्रिशनिस्ट देवयानीने सांगितला सोपा उपाय! लिंबू पाण्यात हिंग, काळी मिरी आणि मीठ टाकून प्या आणि ढेकर, गॅस आणि पोट फुगण्यापासून त्वरित आराम मिळवा. आले आणि ओवा देखील फायदेशीर आहेत.

मुंबई: जरांगे पाटलांचा इशारा: 'लक्षात ठेवा, तुमच्या लोकांनाही महाराष्ट्रात यायचं आहे'
"पोलिसांना सांगून तुम्ही पोरांवर लाठीचार्ज करायला लावाल, ते तर तुमच्यासाठी अतिघातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तो तुम्हाला असणार आहे. कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात यायचं आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा", असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

क्राइम: बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार पोलिसांच्या तावडीतून गोळीबार करत फरार
बलात्काराचा आरोप असलेला पंजाबमधील सनौरचा AAP आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याची माहिती समोर आली आहे. पठाणमाजरा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर गोळीबारही केला, ज्यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. तसेच, आमदाराने पोलिसांवर चारचाकी घालण्याचाही प्रयत्न केला. पोलिस पथक सध्या त्याचा शोध घेत आहेत.

आंतरराष्ट्रीय: "भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला
भारताने आपले एससीओ सदस्यत्व रोखल्याचा आरोप अझरबैजानने केला आहे. अझरबैजान हा पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र मानला जातो. तो अनेक वेळा भारतविरोधी मुद्द्यांवर पाकिस्तान सोबतही उभा राहिला आहे. अझरबैजानच्या या दाव्यावर अद्याप भारताकडून कसल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

आंतरराष्ट्रीय: ट्रम्प यांचा औषधांवर २००% टॅरिफ लावण्याचा प्लॅन: भारतावर काय परिणाम?
डोनाल्ड ट्रम्प यांचा औषधांवर २००% किंवा त्याहून अधिक टॅरिफ लावण्याचा विचार! यामुळे अमेरिकेत आयात होणाऱ्या औषधांच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो. भारत जेनेरिक औषधांचा मोठा निर्यातदार आहे. २०० टक्के टॅरिफ लावल्यास औषध निर्यातदार कंपन्यांना नुकसान होऊ शकते, मात्र ट्रम्प यांचा उद्देश औषधांचे उत्पादन अमेरिकेत हलवण्याचा आहे, ज्यामुळे कंपन्या नाराज आहेत. तज्ज्ञांच्या मते यामुळे अमेरिकेत औषधे महाग होऊ शकतात.

मुंबई: मनोज जरांगे: मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही; फडणवीसांना थेट इशारा!
"आम्ही मुंबई सोडत नसतो. सोडणार नाही. पोलीस तुरुंगातच नेतील. आम्ही तुरुंगात उपोषण करू. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल, असं वागू नका. मराठ्यांना इथून काढून देणं ही काळजात रुतणारी सल आहे. फडणवीस साहेब, ती रुतू देऊ नका. तो जिव्हारी झालेला वार तुम्हाला महागात पडेल", असा इशारा मनोज जरांगे यांनी पोलिसांच्या नोटीसवर बोलताना दिला.

राष्ट्रीय: पंजाब जलमय: १३०० गावांना पुराचा वेढा, २९ जणांचा मृत्यू!
गेल्या महिन्याभरापासून पंजाबवर आस्मानी संकटाचा सामना करत आहे. राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि रावी, सतलज, व्यास नद्यांचा रौद्रवतार यामुळे अर्धे पंजाब पाण्यात बुडाले आहे. १३०० गावांना पुराने वेढा दिला असून, पाऊस आणि पुरामुळे वेगवेगळ्या घटनांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक घरंदार सोडून सुरक्षित स्थळी गेले आहेत.

महाराष्ट्र: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
गणरायाच्या आगमनाला पायघड्या घालत पावसाने झोडपून काढलं. मधल्या काळात पावसाचा जोर कमी झाला होता. पण, पुढील काही दिवस पुन्हा पाऊस धुमाकूळ घालण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय: अख्खं गावचं गिळलं! सुदानमध्ये भुस्खलनात १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला
निसर्गाच्या प्रलयाने सुदान हादरले. भूस्खलन होऊन मातीचा प्रचंड मोठा मलबा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावावर कोसळला. यात तब्बल १००० लोक मरण पावले आहेत. सुदानच्या लष्कराकडून ही माहिती देण्यात आली आहे. लिबरेशन मुव्हमेंटने म्हटले आहे की, सोमवारी झालेल्या भूस्खलनामुळे गाव पूर्ण उद्ध्वस्त झाले असून, एक हजार लोक मरण पावले आहेत.

महाराष्ट्र: ...नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ; छगन भुजबळांचा राज्य सरकारला इशारा
मराठा आणि कुणबी या वेगवेगळ्या जाती आहेत. मराठा सामाजिक मागास नाहीत असे न्यायालयानेच म्हटले आहे. आमच्या ओबीसी प्रवर्गात त्यांचा समावेश करू नका. आम्हाला ओबीसीत वाटेकरी नको. तसे झालेच तर आम्ही न्यायालयात जाऊ, लाखोंच्या संख्येने आम्हीपण मुंबईत येऊ, असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला दिला.

महाराष्ट्र: तोडगा निघणार! मराठा आरक्षणाबाबत सरकारने तयार केला मसुदा, लवकरच निर्णय
मराठा समाजबांधवांना हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदणीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काय करता येईल, मनोज जरांगे पाटील यांनी यासंदर्भात केलेल्या मागण्यांची पूर्तता कशी करता येईल, याचा एक मसुदा राज्य सरकारने तयार केला आहे. त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाईल, असे मराठा समाजासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र: मुंबईचे रस्ते शक्य तितके लवकर सोडा: मनोज जरांगे यांचे मराठा आंदोलकांना आवाहन
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. कोर्टाच्या आदेशानंतर जरांगे यांनी आंदोलकांना मुंबईतील रस्ते रिकामे करण्याचे आणि आझाद मैदानात शांतपणे आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र: आमच्यावर अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार; OBC समाज आक्रमक
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला. OBC आरक्षणाला धक्का लागल्यास लाखोंच्या संख्येने मुंबईत येण्याचा इशारा. कुठल्या जातीला ओबीसीत समाविष्ट करता येत नाही. हा अधिकार कुणालाही नाही. ओबीसी प्रवर्गात सध्या ३७४ जाती आहेत. पवार असो वा फडणवीस कुणीही ओबीसीत जाती समाविष्ट करू शकत नाही असं त्यांनी सांगितले.

व्यापार: जीएसटी दरांमध्ये बदल: फक्त कारच नव्हे, १७५ वस्तू स्वस्त होणार!
जीएसटी परिषदेच्या बैठकीत १७५ वस्तू स्वस्त होणार, एसी, टीव्ही, सिमेंटच्या किमती घटणार आहेत. दिवाळीपूर्वी हायब्रीड कार, स्कूटरवरील जीएसटी कमी होणार, तर कार्बोनेटेड पेये, तंबाखू महागणार आहेत. या जीएसटी कपातीचा खरा फायदा हा टोयोटा, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या कंपन्यांना होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दर २८% वरून १८% पर्यंत कमी होऊ शकतात. एवढेच नाही तर मोटरसायकल, स्कूटरवरील जीएसटी देखील कमी होणार आहे.

मुंबई: मराठा आंदोलनातील नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी, सरकारला निर्देश
मराठा आरक्षण आंदोलनातील नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. आझाद मैदानाबाहेर गर्दी न करण्याचे आणि मंगळवारी दुपारी ४ पर्यंत रस्ते रिकामे करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिलेत. जरांगेंच्या वकिलांना कोर्टाने डिप्लोमेटिक न वागण्याचा सल्ला दिला. बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचे सरकारला हायकोर्टाने आदेश दिलेत. मुंबईतील रस्त्यांवर आंदोलन नको, आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी आहे. जरांगेंची तब्येत बिघडल्यास तात्काळ उपचार द्यावे असं म्हटलं.