
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; १२ तासांसाठी रेड अलर्ट
मुंबईमध्ये २० ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता, काही भागात मुसळधार पाऊस कायम राहील. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघरला पुढील १२ तासांसाठी रेड अलर्ट जारी. पूरजन्य परिस्थितीत NDRF कडून बचावकार्य सुरू असून कोकणात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. २० ऑगस्टला सकाळी ११.३० पर्यंत ३.३ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय: भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नव्हे, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे: अमेरिकन कंपनीचा दावा
'भारताने डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानसोबत केलेल्या युद्धविरामाचे श्रेय दिले नाही, त्यामुळेच अमेरिकेने भारतावर कर लादला आहे. कराचा रशियन तेल खरेदीशी काहीही संबंध नाही,' असा धक्कादायक दावा अमेरिकन ब्रोकरेज फर्म जेफरीजने आपल्या एका अहवालातून केला आहे.

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ!
मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाला मुंबईत एक दिवसाची मुदतवाढ! आझाद मैदानातील उपोषण उद्यापर्यंत सुरू राहणार. पोलिसांनी काही अटींसह परवानगी वाढवली, वाहतूक कोंडी टाळण्याचा इशारा दिला. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा जरांगेंचा निर्धार!

मुंबई: 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
"काही लोकांची विधाने मी सकाळी बघितली आहेत. त्यांचे प्रयत्न काय आहेत, हे माझ्या लक्षात येत आहेत. मी त्यांना सांगतो की, अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं तोंड भाजेल. हे मला त्यांना सांगायचं आहे", असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

आंतरराष्ट्रीय: चांद्रयान-5, तंत्रज्ञान, बुलेट ट्रेन आणि 10 ट्रिलियनची गुंतवणूक: भारत-जपान करार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जपान दौऱ्यात जपानी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत १५ व्या भारत-जपान शिखर परिषदेत व्यापार, गुंतवणूक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानासह द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली. या शिखर परिषदेत दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

मुंबई: "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही", CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
"सरकारने समिती स्थापन केली आहे. मंत्रिमंडळाची उपसमितीही आहे. उपसमितीला यापूर्वीच ज्या काही मागण्या आल्या होत्या. त्यावर ते विचार करत आहेत. नुसती आश्वासने देऊन चालणार नाही. कायदेशीर मार्ग काढावे लागतील. संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील", अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. मनोज जरांगे यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रीय: सिद्धरामय्यांच्या विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला मुद्दा!
'१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत फसवणुकीमुळेच पराभवाचा सामना करावा लागला होता, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते आणि सिद्धरामय्या जनता दलाकडून लढले होते. आता भाजपने त्यांच्या या विधानाचा धागा पकडत काँग्रेसवर निशाणा साधला आहे आणि काँग्रेसवरच मतचोरीचा आरोप करत हल्लाबोल केला आहे.

रत्नागिरी: रत्नागिरी: जगबुडी नदीत गणेश विसर्जनादरम्यान तिघे बुडाले, एक बेपत्ता
रत्नागिरीत जगबुडी नदीत गणेश विसर्जनावेळी तीन जण वाहून गेले. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले, तर एक 40 वर्षीय व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे. मंगेश पाटील या व्यक्तीचा NDRF कडून शोध सुरू आहे.

महाराष्ट्र: राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल: संजय राऊत
शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर राहुल गांधींना बदनाम करण्याचा आरोप केला आहे. बिहारमधील 'मतदार हक्क यात्रे'दरम्यान पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारे भाजपचेच लोक असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे.

राष्ट्रीय: उत्तराखंडमध्ये पुन्हा हाहाकार! ढगफुटीमुळे 10 जण ढिगाऱ्याखाली
उत्तराखंडमध्ये अतिमुसळधार पावसामुळे रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. ढिगाऱ्याखाली आठ जण अडकले असून, प्रशासनाने म्हटले आहे की, ज्या ठिकाणी घटना घडल्या आहेत, तिथे युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.

सखी: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भारतीय 'गवार'चे वावडे?
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय गवार निर्यातीवही संकट येण्याचा धोका आहे. भारत गवारच्या भाजीचा सर्वात मोठा उत्पादक, अमेरिका प्रमुख आयातदार. गवार गमचा वापर अन्न, औषध, तेल उद्योगात केला जातो. टॅरिफचा फटका आता या निर्यातीलाही बसू शकतो.

आंतरराष्ट्रीय: भारताने पाणी सोडले, म्हणून मृतदेह वाहत आले: पाकिस्तानी मंत्र्यांचा अजब दावा
पाकिस्तानमध्ये सध्या अनेक ठिकाणी महापूर आला आहे. अशा परिस्तितीत, संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एक विचित्र विधान केले. त्यांच्या मते, भारताकडून सोडण्यात आलेल्या पुराच्या पाण्याने मृतदेह, गुरे आणि कचऱ्याचा ढीग पाकिस्तानात आला आहे. या ढिगाऱ्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या मदत कार्यात अडथळा येत आहे.

मुंबई: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावले
"आंदोलक हे काही दहशतवादी नाहीत. ते मराठी माणसं आहेत. ते हक्काने विघ्नहर्त्याच्या उत्सवातच न्याय मागायला आले आहेत. दहा जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्ही आणि आंदोलक थेट बोला ना", अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला सुनावले. मनोज जरांगेंचे उपोषण सुरू झाल्यानंतर त्यांनी ही भूमिका मांडली.

सखी: वजन कमी करायचं तर व्यायाम कमी करा!
वजन कमी करण्यासाठी हेवी वर्कआउट टाळा, कारण त्याने भूक वाढते आणि कॅलरी वाढतात. उपवास, कमी खाणे, आणि कार्ब्स-फॅट्स कमी केल्याने शरीरातील कॅलरी बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होते, वजन कमी करायचं असेल तर आधी आहार नियंत्रण आणि योग्य आहार यावर भर द्यायला हवा.

राष्ट्रीय: 'PM मोदींना जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलणार!'- अमित शाह
बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ केल्याने अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तुम्ही मोदींना जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलणार, असा पलटवार त्यांनी केला. राहुल गांधी द्वेषपूर्ण राजकारण करत असल्याचा आरोप करत, काँग्रेसच्या नकारात्मकतेमुळे भाजप अधिक उंचावर जाईल, असेही शाह म्हणाले.

क्रिकेट: रोहितला संघाबाहेर ठेवण्यासाठी ब्राँको टेस्ट? माजी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप!
माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने गंभीर आरोप केला आहे. रोहित शर्माला २०२७च्या वर्ल्डकप संघातून बाहेर ठेवण्यासाठी ब्राँको टेस्ट आणली. विराट कोहली तंदुरुस्त, पण रोहितला फिटनेसवर लक्ष द्यावे लागणार, असे तो म्हणाला. तसेच, निवड समितीच्या निर्णयावरही त्याने प्रश्न उपस्थित केले.

सखी: रोज लिपस्टिक लावल्याने काय होते?
रोज लिपस्टिक लावणं अनेकींना आवडतं. लिपस्टिक लावल्यानं सुंदरही दिसतात ओठ. पण सतत लावली तर ओठ कोरडे पडणे, हार्मोनल असंतुलन, ओठांचा रंग बदलणे असाही त्रास होऊ शकतो. त्यात लिपस्टिकचा दर्जा चांगला नसल्यास त्रास अजून वाढतो.

आंतरराष्ट्रीय: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली; व्हिडीओ पहा
रशियाने युक्रेनच्या नौदलाच्या मोठ्या युद्ध नौकेवरच हल्ला केला. पाण्यात हल्ला करण्यास सक्षम असलेल्या ड्रोनने हा हल्ला करण्यात आला. युद्ध नौका बुडाली असून, या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण बेपत्ता झाले आहे. युक्रेन आणि रशिया दोन्ही देशांकडून या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. युद्ध नौकेवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओही समोर आला आहे.

सखी: ChatGPT च्या नादी लागणं पडलं महागात, झाला जीवाशी खेळ
ChatGPT ला सल्ले विचारुन त्याप्रमाणे वागणं आता नवीन राहिलेलं नाही. पण आपले आजार-उपचार यासाठी डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे न जाता वॉरेन टियर नावाच्या गृहस्थांनी चाटजीपीटीच्या सल्ल्याने आपल्या आजाराकडे काहीसं दुर्लक्ष केलं आणि पुढे स्टेज फोर कॅन्सरचं निदान झालं..

राष्ट्रीय: PM मोदींविरोधात अपशब्द वापरणाऱ्यावर कारवाई, आरोपीला अटक!
बिहारमधील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या युकवाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. आता त्याला बिहार पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव रिजवी असल्याचे समजते. ही घटना काँग्रेस रॅलीत घडली होती. यावरून राजकीय वातावरणही तापले होते. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सखी: तरुण पिढीमध्ये 'होमोसेक्शुॲलिटी' ट्रेंड वाढतोय; हे आहे तरी काय?
होमोसेक्शुॲलिटी म्हणजे स्वार्थासाठी किंवा गरजेसाठी बनलेले नाते. अमेरिका-युरोपमध्ये सुरू झालेला ट्रेंड आता भारतातही वाढतोय. यात व्यक्ती घर, आर्थिक मदतीसाठी नात्याचा वापर करते. वाढते भाडे आणि एकाकीपणामुळे हे प्रमाण वाढले आहे.

मुंबई: मराठा आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही: मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. सरकार सहकार्य करत असल्याने आंदोलकांनी शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. पण त्याबरोबरच आरक्षण मिळाल्याशिवाय मैदान सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आबे. सामान्य जनतेला त्रास न देण्याचे आवाहन करत, त्यांनी सरकारला चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र: मराठा क्रांती मोर्चा: आझाद मैदान गच्च भरलं!
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदान गच्च भरल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि फोर्ट परिसरात आंदोलकांनी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र: मराठा वादळ मुंबईत: 'एक मराठा लाख मराठा'ने वाशी टोल नाका दणाणला
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. 'एक मराठा लाख मराठा' घोषणांनी वाशी टोल नाका दणाणून गेला. २८ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलक जमा होऊ लागले होते. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या ताफ्याचे वाशी टोल नाक्यावर जंगी स्वागत झाले.

राष्ट्रीय: भाजप आणि RSS मध्ये कोणताही वाद नाही: मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
राष्ट्रीय स्वायंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष समारंभाच्या आज(दि.२८) तिसऱ्या दिवशी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी संघावर उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी सरसंघचालक म्हणाले की, आरएसएस आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. संघाचा केंद्र आणि राज्य सरकारांशी चांगला समन्वय आहे.

महाराष्ट्र: एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. आजच्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका. आमचे संबंध फार चांगले आहेत. कुठलेही कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याचा आनंद आहे. आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो. आम्ही दरवर्षी येतो, पण यावर्षी काही पहिल्यांदात आले आहेत असं सांगत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

नवी मुंबई: नवी मुंबईत मराठा मोर्चा: वाहतूक बदल, कोणते रस्ते बंद आणि खुले?
मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. हा मोर्चा मुंबईकडे येत असून, वाहतुकीच्या मार्गातही बदल केले गेले आहेत. नवी मुंबई पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही रस्ते सामान्य वाहनांसाठी बंद केले आहेत. त्याचबरोबर पर्यायी रस्तेही खुले करण्यात आले आहेत.

सखी: सणासुदीत पाय दुखतात? टाचा ठणकतात?
सणासुदीत कामामुळे पाय दुखतात? पाणी भरपूर प्या, पोटॅशियमयुक्त पदार्थ खा, तिळाच्या तेलाने मसाज करा, व्यायाम करा आणि कॅल्शियम-मॅग्नेशियमयुक्त आहार घ्या. या उपायांमुळे दुखणं कमी होईल आणि कामंही होतील झटपट..

सखी: प्रेमासाठी काही पण! क्वांटम डेटिंग: तरुणाईचा नवा ट्रेंड..
क्वांटम डेटिंग म्हणजे बंधनमुक्त नातेसंबंध! कमिटेमेंट नको पण नातं हवं असं सांगणारा एक नवीन ट्रेंड. अनेकांना आपलं करिअर, जगण्यातली अनिश्चतता यामुळे नात्याची कमिटमेंट नको वाटते, पण प्रेम आणि सहवास हवासा वाटतो. त्यातून हे नातं तयार होतं. अर्थात त्याचेही अनेक फायदेतोटे आहेतच.

आंतरराष्ट्रीय: रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, अनेकांचा मृत्यू
रशियाने युक्रेनची राजधानी कीवमधील युरोपियन युनियन प्रतिनिधी भवनावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४८ जण जखमी आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, कीववरील रशियन हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात तीन मुलांचा समावेश आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध होणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय: 'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले
हिमाचल प्रदेशपासून पंजाबपर्यंत अनेक ठिकाणी नद्यांना महापुर आले असून, भारतीय लष्कर पूरग्रस्त भागात लोकांच्या मदतीसाठी उतरले आहे. पंजाबमधील गुरूदासपूरमध्ये पुराने वेढा दिल्याने मृत्यूच्या जबड्यात अडकलेल्या २७ जणांना भारतीय लष्कराने सुखरुपपणे बाहेर काढले.