
क्राइम: बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार पोलिसांच्या तावडीतून गोळीबार करत फरार
बलात्काराचा आरोप असलेला पंजाबमधील सनौरचा AAP आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याची माहिती समोर आली आहे. पठाणमाजरा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर गोळीबारही केला, ज्यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. तसेच, आमदाराने पोलिसांवर चारचाकी घालण्याचाही प्रयत्न केला. पोलिस पथक सध्या त्याचा शोध घेत आहेत.

महाराष्ट्र: मुंबईकडे कूच करणारच इतक्यात वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश स्थगित, कारण...
मनसेतून बाहेर पडलेले वैभव खेडेकर ४ सप्टेंबर रोजी भाजपात प्रवेश करणार होते, परंतु ओबीसी व मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. लवकरच नवी तारीख जाहीर होईल, असे खेडेकरांनी सांगितले. आयुष्याची ३० वर्ष विरोधात घालवली. सातत्याने संघर्ष केला. कार्यकर्त्यांनी कधीच सत्तेचा उपभोग घेतला नव्हता. आज सत्तापक्षात जाताना त्यांना आनंद होत आहे असं त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय: जीएसटी कपातीच्या बैठकीत राजकीय रणकंदन; विरोधकांचा कडवा प्रतिकार, मतदानाची शक्यता होती
जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठा राजकीय गदारोळ झाला. विरोधी राज्यांनी महसूल नुकसानीवरून तीव्र विरोध दर्शवला, ज्यामुळे बैठक रात्री उशिरापर्यंत चालली. मतदानाची वेळ आल्यावर पश्चिम बंगालने मध्यस्थी करत तोडगा काढला आणि कपातीवर एकमत झाले. २२ सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत.

राष्ट्रीय: पुरामुळे भारत-पाक सीमेचे मोठे नुकसान; ११० किमी कुंपण उद्ध्वस्त
भारत-पाक सीमेवर पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. ११० किमी कुंपण उद्ध्वस्त झाले असून ९० बीएसएफ चौक्या पाण्याखाली गेल्या आहेत. बीएसएफ जवान सतर्क असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. ड्रोन, मोठ्या सर्चलाइट्स, बोटींद्वारे या भागात गस्त घातली जात आहे. पंजाबच्या सर्वच्या सर्व २३ जिल्ह्यांतील १४०० हून अधिक गावे पुराच्या पाण्यात बुडालेली आहेत.

राष्ट्रीय: मणिपूर हिंसा: PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी सरकार आणि कुकी समूहामध्ये शांतता करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 सप्टेंबर रोजी मणिपूर राज्याचा दौरा करण्याची चर्चा आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वी सरकारला मोठे यश मिळाले आहे. केंद्र आणि मणिपूर सरकारने गुरुवारी (४ सप्टेंबर २०२५) कुकी-झो कौन्सिल (केझेडसी) सोबत एक नवीन करार केला आहे, ज्याअंतर्गत सर्व पक्षांनी राज्याची प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग-२ उघडण्यास सहमती दर्शविली आहे.

सोलापूर: महिला आयपीएसला धमकी: अजित पवारांनी राजीनामा द्यावा; नेत्याची मागणी
माढ्यात अवैध उत्खनन रोखणाऱ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला अजित पवारांनी धमकावल्याचा आरोप अतुल खुपसे यांनी केला. आठ दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.

मुंबई: मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, कधी असणार सुट्टी?
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन असून, त्यापूर्वी ईद ए मिलाद असल्याने राज्य सरकारने मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सुट्टीमध्ये बदल केला आहे. वार्षिक सुट्ट्या जाहीर करताना शुक्रवारी, ५ सप्टेंबर रोजी ईद ए मिलादची सुट्टी जाहीर केलेली आहे. मात्र, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद ए मिलादची सुट्टी सोमवारी असणार आहे. तशी घोषणा राज्य सरकारने केली आहे.

महाराष्ट्र: भुजबळांच्या शंका दूर करू, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही: CM फडणवीस
मराठा आरक्षणासंदर्भात जो जीआर काढलेला आहे. त्याचा ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम होणार नाही. एका समाजाचे काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही. छगन भुजबळ आणि इतरांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, असे CM फडणवीस यांनी म्हटले आहे.

व्यापार: UPI ची मर्यादा वाढली; आता 10 लाखांपर्यंत व्यवहार करता येणार
NPCI ने UPI व्यवहाराची मर्यादा 1 लाखावरून 10 लाखांपर्यंत वाढवली आहे. कर भरणा, विमा प्रीमियम आणि गुंतवणुकीसाठी 15 सप्टेंबर 2025 पासून हा बदल लागू असेल. मात्र, P2P व्यवहार मर्यादा 1 लाखच राहील.

महाराष्ट्र: इतनी डेरिंग है तुम्हारी! महिला पोलीस अधिकाऱ्याला अजित पवारांनी खडसावले
सोलापुरात अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करणाऱ्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोनवरून खडसावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात अजित पवार यांनी अधिकाऱ्याला कारवाई थांबवण्याचे आदेश दिले, मात्र कृष्णा यांनी अजित पवारांना ओळखण्यास नकार दिला. यामुळे संतप्त पवारांनी "तुम पे अॅक्शन लुंगा, इतनी डेरिंग है तुम्हारी. मेरा चेहरा तो पहचानोगी ना..' असं सांगत व्हिडीओ कॉल केला.

महाराष्ट्र: "...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांचा सवाल, दाखवले आकडे
हैदराबाद गॅझेटसंदर्भातील जीआर टाचणीभरही फायद्याचा किंवा उपयोगाचा नाही, असे म्हणत मराठा आरक्षणाचा लढा कोर्टात लढत असलेल्या विनोद पाटील यांनी यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. "मूळ प्रश्न हा की, शिंदे समितीला नव्याने सापडलेल्या नोंदी किती? बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?" असे सवाल आता पाटील यांनी केले आहेत.

मुंबई: दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणा: शिंदेसेनेच्या खासदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी दक्षिण मुंबईतील आंदोलनांवर नियमावली करण्याची मागणी केली. मुंबईचे आर्थिक आणि राजकीय महत्त्व लक्षात घेता, त्यांनी या भागात आंदोलनांवर सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रण ठेवण्याची भूमिका मांडली. मुंबईचं कामकाज सुरळीत राहील, महाराष्ट्र आणि देशाच्या आर्थिक आणि राजकीय राजधानीत बाधा निर्माण होणार नाही अशी पावले उचलण्याची मागणी केली

राष्ट्रीय: काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; खरगेंचा भाजपवर निशाणा
जीएसटी सुधारणांची मागणी सर्वप्रथम काँग्रेसनेच केली होती, असा दावा मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. भाजपने जीएसटीला गुंतागुंतीचे बनवल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने नेहमीच कर प्रणाली सोपी करण्याची मागणी केली. राहुल गांधींचे जुने ट्विट शेअर करतही काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला.

आंतरराष्ट्रीय: "राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत...", पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
अमेरिकेचे भारत, चीनसोबत संबंध ताणले गेले आहेत. याच मुद्द्यावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भाष्य केले आहे. अमेरिका चीन आणि भारतासोबत अशा पद्धतीने बोलू शकत नाही, अशा शब्दात पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावले. पुतीन यांनी चीनमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

व्यापार: घर खरेदीदारांना मोठा दिलासा! सिमेंटवरील जीएसटी घटल्याने घरांच्या किमती होणार कमी!
स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जीएसटी परिषदेने ३ सप्टेंबर रोजी सिमेंटवरील कराचा दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बांधकाम खर्च कमी होणार असून, त्याचा थेट फायदा घर खरेदीदारांना मिळणार आहे.

व्यापार: GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे फटका बसणार?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत नवीन सुधारणांबाबत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आता फक्त ५% आणि १८%, असे दोन जीएसटी स्लॅब असतील, तर हानिकारक आणि सुपर लक्झरी वस्तूंसाठी ४०% चा विशेष स्लॅब असेल. मात्र, आता जीएसटी २.० अंतर्गत त्यात केलेले बदल, संकलनावर परिणाम करू शकतात.

राष्ट्रीय: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, थरकाप उडवणारी दृश्ये
देशाच्या राजधानीमध्ये यमुनेच्या पुरामुळे हाहाकार उडाला आहे. असंख्य घरे पाण्याखाली गेली आहेत. ६३ वर्षांत यमुनेने चौथ्यांदा ही पाणीपातळी गाठली आहे. त्यामुळे हजारो लोकांना सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा लागला आहे. युमनेला आलेल्या पुरामुळे दिल्लीच्या नाकातोंडातच पाणी गेलं आहे. गुरूवारी सकाळी नदीचे पाणी दिल्ली मंत्रालयापर्यंत पोहोचले होते.

व्यापार: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
जीएसटी परिषदेने १२ टक्के आणि २८ टक्के हे दोन्ही स्लॅब वगळले. त्यामुळे आता दोनच स्लॅब देशात असणार असून, ४० टक्के हा विशेष स्लॅब असणार आहे. या स्लॅबमध्ये येणाऱ्या वस्तू खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर ताण पडणार आहे.

क्रिकेट: पाकिस्तानी क्रिकेटर हैदर अली बलात्कार प्रकरणात निर्दोष, कोर्टाने दिला निर्णय
पाकिस्तानी क्रिकेटर हैदर अलीवर बलात्काराचा आरोप होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. पुराव्याअभावी न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. अलीने आरोप फेटाळले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला निलंबित केले होते. आता प्रकरणाचा निकाल आल्यानंतर पाक क्रिकेट बोर्ड त्याचे निलंबन मागे घेणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र: बाजारगावात सोलार एक्सप्लोसिव्हमध्ये भीषण स्फोट, एकाचा मृत्यू; अनेक कामगार जखमी!
नागपूरजवळील बाजारगावात सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर १६ कामगार जखमी झाले आहेत. जखमींवर नागपुरात उपचार सुरू असून, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.

व्यापार: शेतकऱ्यांची दिवाळी! GST कपातीमुळे काय फायदा? वाचा!
जीएसटी परिषदेने कृषी उपकरणे, ट्रॅक्टर पार्ट्स, खते व कीटकनाशकांवरील जीएसटी दर कमी केले. ट्रॅक्टर व कृषी यंत्रांवरील जीएसटी १२% वरून ५% पर्यंत घटवला. खते आणि कीटकनाशके स्वस्त होणार आहेत. शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. ट्रॅक्टरच्या स्पेअर पार्ट्ससह टायर, ट्यूब आदींवरही पैसे वाचणार आहेत.

व्यापार: GST परिषदेकडून मोठी घोषणा! १२% आणि २८% स्लॅब रद्द
सर्व वस्तू आता ५% व १८% स्लॅबमध्ये. आलिशान गाड्या, फास्ट फूड महागणार. विमा, घरे, औषधे स्वस्त होणार आहेत. आज जीएसटी परिषदेची बैठक सुरु होती. पहिल्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. वैयक्तिक विमा पॉलिसी आणि आरोग्य विमा पॉलिसी जीएसटीमुक्त करण्यात आल्या आहेत. मोठी यादीच देण्यात आली आहे.

महाराष्ट्र: आता कारखान्यात १२ तास काम, पण...: कामगारांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
कारखान्यांमधील कामगारांच्या काम करण्याची मर्यादा ९ तासांवरून १२ तास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. कामगारांना एका आठवड्यात जास्तीतजास्त ४८ तासच काम देता येते. ही मर्यादा कायम राहणार आहे. आधी दररोजच्या कामाच्या तासांची मर्यादा ही नऊ तास इतकी होती. आता ती १२ तास करताना ८ तासांपेक्षा कितीही जास्तीचे काम करवून घेतले तर कामगारांना ओव्हरटाइमचे पैसे द्यावे लागतील.

राष्ट्रीय: दिल्लीत यमुनेचे मदत छावण्यांमध्ये पाणी, 2013 चा उच्चांक मोडला
दिल्लीत यमुना नदी धोक्याच्या पातळीवर! 2013 चा विक्रम मोडला. पुरग्रस्तांच्या मदत छावण्यांमध्ये पाणी शिरल्याने स्थलांतर. वझिराबाद आणि ओखला बॅरेजमधून जर जास्त पाणी सोडले गेले तर दिल्लीत हाहाकार उडण्याची शक्यता आहे. रात्री ८ नंतरही पाण्याची पातळी वाढू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. यमुनेतील पाण्याचा प्रवाह वेगाने वाढला असून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्र: भुजबळ यांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन: तात्पुरते उपोषण, आंदोलन थांबवा, कारण...
मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने एक जीआर जाहीर केला आहे. या शासन निर्णयात काही वाक्ये, शब्द याबद्दल संभ्रम आहे. मी इतर ओबीसी नेत्यांशी चर्चा करत आहे. अनेक कायदेतज्ज्ञ, वकील यांना ही कागदपत्रे देऊन याबाबत जो काही संभ्रम आहे त्याबद्दल त्यांची मते जाणून घेत आहोत. आवश्यक असल्यास निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करून कदाचित सोमवारी, मंगळवारपर्यंत हायकोर्टात जाण्याची आमची तयारी आहे असं भुजबळांनी सांगितले.

महाराष्ट्र: देशात राजकीय भूकंप येणार? 'हायड्रोजन बॉम्ब'नंतर २ बड्या नेत्यांचे दावे
बिहारमधील यात्रेत राहुल गांधींनी 'हायड्रोजन बॉम्ब'चा उल्लेख करत सरकारला इशारा दिला. त्यानंतर संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे. पुढील काही महिन्यात राजकीय बदल होतील असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही नागपूर कामठीत बोलताना देशात मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत देत भाजपवर निशाणा साधला. या दोन्ही नेत्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

आंतरराष्ट्रीय: निर्बंधांचा फटका: सौदी अरेबियाकडून भारतीय कंपनीला तेल पुरवठा खंडित!
रशियाकडून तेल खरेदी केल्याने EU च्या निर्बंधामुळे सौदी आणि इराकने नायराला तेल देणे थांबवले आहे. नायराला आता रशियावर अवलंबून राहावे लागेल. भारतासाठी हा मोठा धक्का आहे. वडिनार येथील नायराची ४,००,००० बॅरल/दिवस रिफायनरी आता ७०-८०% क्षमतेने चालू आहे. नायरा एनर्जी ही देशाच्या एकून रिफायनरिच्या क्षमतेपैकी ८ टक्के उत्पादन करते.

राष्ट्रीय: प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभेच्या रिंगणात
सक्रिय राजकारणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. बिहारमधील रोहतास जिल्ह्यात असलेल्या करगहर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. पाटण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी याबद्दलची घोषणा केली.

आंतरराष्ट्रीय: ट्रम्प यांचा डाव फसला; पुतिन यांची मोठी ऑफर, भारतानेही केली तयारी
रशियाकडून तेल खरेदीवर नाराज होत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावला. मात्र भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. त्यातच आता रशियाने आणखी सवलत दिल्याने भारत रशियाकडून होणारी तेल खरेदी वाढण्याची शक्यता आहे, अलीकडेच व्लादिमीर पुतिन आणि नरेंद्र मोदी यांची चीनमध्ये भेट झाली. या भेटीनंतर रशियाने भारताला तेल खरेदीत ही ऑफर दिल्याचे पुढे आले आहे.

महाराष्ट्र: भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, राष्ट्रवादीची तातडीची बैठक
ओबीसी आरक्षणावरून नाराज छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची तातडीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बोलवण्यात आली आहे. सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी संघटनांमध्ये असंतोष असून कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयात जाण्याचा इशारा भुजबळांनी दिला आहे. तर ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही यामुळे धक्का लागणार नाही. त्यामुळे विनाकारण गैरसमज करून घेऊन नये असं मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

मुंबई: मंत्रिमंडळ १५ निर्णय: मुंबई-ठाणे मेट्रो, लोकल खरेदी, पुणे-लोणावळा वाढीव मार्गिका मंजूर
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई-ठाणे नवीन मेट्रो मार्ग, मुंबई लोकल खरेदी, पुणे-लोणावळा तिसरी-चौथी मार्गिकेला मंजुरी देण्यात आली. दिव्यांगांना अर्थसहाय्यात वाढ, नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र, आउटर रिंग रोडलाही मान्यता मिळाली.