व्यापार: एअरटेल, टाटाला १० हजार कोटी द्यावे लागणार; Vi ला दिलासा
दूरसंचार विभागाने एजीआर थकबाकीशी संबंधित नियमांची घोषणा केली आहे. यानुसार भारती एअरटेल आणि टाटा टेलिसर्व्हिसेसला सुमारे १०,००० कोटी रुपये सरकारला एजीआर थकबाकी म्हणून द्यावे लागतील. ही रक्कम ३१ मार्चपर्यंत भरणं आवश्यक आहे. दुसरीकडे, व्होडाफोन आयडियाला या थकबाकीतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
क्रिकेट: SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
रिषभ पंतच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानात ५ विकेट्सनी पराभूत करत यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. मोहम्मद शमीसह प्रिन्स यादव आणि आवेश खान यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर लखनौ संघाने तगडी फलंदाजी असलेल्या हैदराबादच्या संघाला १५६ धावांवर रोखले होते. या धावांचा पाठलाग करताना एडन मार्करमने २७ चेंडूत ४५ धावांची दमदार खेळी केल्यावर कर्णधार रिषभ पंत याने नाबाद ६८ धावांची खेळी केली.
राष्ट्रीय: जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळमधील कुन्नाथुनाडू येथे आयोजित सभेतून राज्यातील तरुणांना राज्यातच रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देत NDA सरकारला संधी देण्याचे आवाहन केले. यावेळी शाहांनी केरळमधील सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि NDA सरकार आल्यास रोजगारनिर्मिती करून तरुणांना गल्फ देशात जाण्यापासून रोखू, असे आश्वासन दिले.
पुणे: Pune Crime: स्वारगेट परिसरात पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण;दोघे अटकेत
पुणे : हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून तिघांना मारहाण केल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावरील धोबी घाट भागात घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक केली. याबाबत कानिफनाथ विष्णू नायडू (वय ५१, रा. सेवक मित्र मंडळाजवळ, कासेवाडी, भबानी पेठ) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राष्ट्रीय: बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे आयोजित सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर जोरदार टीका केली. बंगालमध्ये परिवर्तनाची लाट सुरू झाली असून, घुसखोरांना बाहेर काढले जाईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच टीएमसीवर भ्रष्टाचार, हिंसा आणि कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोपही त्यांनी केला.
पुणे: लॉजचं नाव ‘स्वर्ग’, आत सुरू होता घाणेरडा खेळ; पुण्यातील 'त्या' कॉलेजवळील सेक्स रॅकेट उघड
पुणे - शहरातील अनैतिक मानवी वाहतूक व वेश्याव्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत गुन्हे शाखेच्या पथकाने न-हे गाव परिसरातील एका लॉजवर छापा टाकत ४ महिलांची सुटका केली असून ३ पुरुष आरोपींना अटक केली आहे.
पुणे: पुणे पालिकेला उशिरा सुचले शहाणपण; धोकादायक झाडांचे सर्वेक्षण सुरू
पुणे : पुण्यात फूल विक्रेत्या महिलेचा बळी गेल्यानंतर पीएमसीच्या अधिकाऱ्यांना उशिरा शहाणपण सुचले असून आता अवकाळी आणि पुढील येणाऱ्या पावसाळ्यात होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पीएमसीने शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि छाटणी मोहीम सुरू केली आहे.
पुणे: सीईटी परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर? आमदार राहुल कुल यांची कठोर कारवाईची मागणी
पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात आलेल्या एल.एल.बी. तिसऱ्या वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादरपूर्वक उल्लेख झाल्याचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी पत्राद्वारे केली आहे.
आंतरराष्ट्रीय: VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सैन्याने मोठी बचाव मोहीम राबवत इराणमध्ये अडकलेल्या आपल्या एअरफोर्स अधिकाऱ्याची सुटका केल्याचा दावा केला आहे. सुमारे ४८ तासांच्या कारवाईनंतर या पायलटला सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे अमेरिकेने सांगितले. मात्र, या बचाव मोहिमेदरम्यान अमेरिकेची काही विमाने पाडल्याचा दावा इराणने केला आहे.
राष्ट्रीय: होर्मुझ संकटात भारताचा 'थार प्लॅन' यशस्वी; तेल उत्पादनात विक्रमी वाढ
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे निर्माण झालेल्या संकटातही भारताच्या 'थार प्लॅन'मुळे तेल उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. ऑइल इंडियाने राजस्थानच्या थार वाळवंटात उत्पादन ७०% ने वाढवले, ज्यामुळे जागतिक अडचणी काही दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ऑइल इंडियाने राजस्थानमधील तेल क्षेत्रातून ४३,७७३ मेट्रिक टन कच्च्या तेलाचे उत्पादन केले. जे मागील वर्षीच्या ३२,७८७ मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे.
पुणे: सोन्याची अंगठी, कपडे, भेटवस्तू दिल्या तरीही...; चिठ्ठी लिहिली अन् सराफ व्यावसायिकाने उचलल टोकाचं पाऊल
पुणे : प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने तरुण सराफा व्यावसायिकाने दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने तब्बल १२ पानी सुसाईड नोट लिहून आपली व्यथा मांडली आहे. ही घटना ६ मार्च रोजी फुरसुंगी परिसरात घडली. प्रतीक राजेंद्र मेमाणे (वय २९, रा. फुरसुंगी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील राजेंद्र मेमाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रेया दादासो खोपडे देशमुख (शिक्केकरी) (रा. आंबेड, भोर) हिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२५ ते ६ मार्च २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
ऑटो: कुटुंबाला धक्काही लागणार नाही! 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त CNG कार, किंमत फक्त...
तुम्ही सुरक्षित आणि CNG वर चालणारी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर Tata Punch CNG हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी किमतीत चांगली सेफ्टी देणाऱ्या कारमध्ये आता Tata Punch CNG चे नाव अग्रस्थानी आले आहे. विशेष म्हणजे या कारला आता ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.
आंतरराष्ट्रीय: इराणमध्ये गेमचेंजर मिसाइल अमेरिका करणार तैनात?; जाणून घ्या वैशिष्टे
मध्य पूर्वेत तणाव वाढल्याने अमेरिकेने इराणला लक्ष्य करत 930 किमी रेंजची JASSM-ER क्षेपणास्त्रे तैनात केली. JASSM-ER क्रूझ मिसाइल १,००० पौंड वजनाच्या पेनेट्रेटिंग स्फोटक-फ्रॅगमेंटेशन वॉरहेडने सुसज्ज आहे, जी मजबूत ठिकाणे भेदण्यास सक्षम आहे. ही मिसाइल शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या बाहेर राहून टार्गेटवर हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. अमेरिकेने एकूण JASSM-ER शस्त्रसाठ्यापैकी सुमारे ८२ टक्के क्षेपणास्त्रे इराण युद्धासाठी तैनात केले आहेत
आंतरराष्ट्रीय: युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
US Iran War: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलांवर गंभीर आरोप झाले आहेत. युद्धाच्या परिस्थितीत खाडी देशांना ड्रोन तंत्रज्ञान विकून ट्रम्प यांचे पुत्र एरिक ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर मोठा आर्थिक फायदा कमावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
धाराशिव: अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
तुळजापूर : "अजितदादांच्या विमान अपघाताबाबतचा जो प्राथमिक अहवाल समोर आला आहे, त्यावर आम्ही अजिबात समाधानी नाहीत. या प्रकरणाचा सखोल तपास होऊन सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे," अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली.
राष्ट्रीय: भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
मध्यपूर्वेतील युद्ध आणि ऑपरेशन सिंदूरमधून मिळालेल्या अनुभवानंतर भारताने संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेतला आहे. युद्धाच्या वेळी शस्त्रांची उपलब्धता आणि त्यांची मारक क्षमता किती महत्त्वाची असते, हे लक्षात घेऊन संरक्षण मंत्रालयाने भारतीय वायुसेनेला अधिक मजबूत करण्यासाठी स्वदेशी १००० किलो हवाई बॉम्ब खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाने ६०० बॉम्बसाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टदेखील जारी केला आहे.
पुणे: जिल्हा रुग्णालयातील इंजेक्शन चोरी प्रकरणाबाबत चार महिन्यांनंतर अहवालाचे‘ इंजेक्शन’
पिंपरी : जिल्हा रुग्णालयातून मेन्फेटामिन सल्फेट इंजेक्शनच्या चोरीच्या प्रकरणात चार महिन्यांनंतर चौकशी समितीने अहवाल दिला आहे. तो पुणे आरोग्य उपसंचालक कार्यालयात नुकताच दाखल केला आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये या प्रकरणात वर्ग-४ कर्मचारी आणि औषध दुकानाचा शिपाई स्वप्निल चव्हाण याला निलंबित केले होते.
तंत्रज्ञान: AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
२०२६ च्या सुरुवातीला जागतिक टेक उद्योगात मोठ्या प्रमाणात नोकरकपातीची लाट आली आहे. Oracle, Meta, Amazon यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच तब्बल ५१ हजारांहून अधिक नोकऱ्या कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कंपन्या खर्च कमी करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत असल्यामुळे हा बदल होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पिंपरी -चिंचवड: कामगारांच्या रक्त तपासणी अहवालात घोटाळा;नियम डावलून बनावट अहवाल
पिंपरी : चाकण आणि कराड (सातारा) येथील काही प्रयोगशाळांनी काही कारखान्यातील कामगारांच्या रक्त तपासणीचे बनावट अहवाल दिल्याचा प्रकार समोर आला आहे. नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग ॲण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजच्या (एनएबीएल) नियमांचे उल्लंघन करून हे रिपोर्ट दिले जात आहेत. शासनाच्या निर्णयानुसार कारखान्यातील कामगारांची आरोग्य तपासणी अनिवार्य आहे, पण या प्रयोगशाळांनी नियम डावलून कामगार-मालक दोघांचीही फसवणूक केली.
क्राइम: मुंबईतील दहशतवादी कट उधळला; ४ अटकेत, पाकिस्तानी नेटवर्क उघड
उत्तर प्रदेश एटीएसने मुंबईत हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी सूत्रधारांशी संबंधित दहशतवादी मॉड्यूल उघडकीस आणले. धार्मिक तणाव आणि हिंसा भडकावण्याचे निर्देश पाकिस्तानी हँडलरकडून युवकांना दिले जात होते. या नेटवर्कचा मुख्य उद्देश मुंबईत दहशत पसरवणे हा होता. लोकेश आणि त्याचा साथीदार विकास यांना हँडलरने विशेषतः मुंबईत पाठवले होते. या दोघांना तेथील शोरूम आणि वाहनांना आग लावण्याचे निर्देश देण्यात आले होते.
व्यापार: आता ५ वर्षे वाट पाहायची गरज नाही; फक्त एका वर्षात मिळणार ग्रॅच्युटी, जाणून घ्या नवीन नियम..
केंद्र सरकारच्या नवीन लेबर कोडनुसार ग्रॅच्युटी (Gratuity) नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलानुसार फिक्स्ड-टर्म एम्प्लॉयी (FTE) म्हणजे ठराविक कालावधीच्या करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता ग्रॅच्युटीसाठी ५ वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही. फक्त १ वर्षाची सलग सेवा पूर्ण केल्यानंतर ते ग्रॅच्युटीसाठी पात्र ठरणार आहेत.
पुणे: काँग्रेसने बारामती पोटनिवणूक लढण्याचा आग्रह सोडावा - रामदास आठवले
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेली बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आपल्या पक्षाची इच्छा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही निवडणूक लढण्याचा आग्रह सोडायला हवा. याबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना तशा सूचना द्याव्यात, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केले. तसेच जर निवडणूक झालीच तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय: अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
कानपूर जिल्ह्यातील बिधनू परिसरात अंधश्रद्धा आणि तांत्रिक विधीच्या नावाखाली एका बापाने स्वतःच्या आठ वर्षांच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी ओरडल्यामुळे आसपासच्या लोकांनी तत्काळ धाव घेतली आणि मुलीचा जीव वाचवला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपी बापाला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले.
आंतरराष्ट्रीय: कोलकात्यावर हल्ल्याची धमकी: पाकिस्तानकडे असे कोणते क्षेपणास्त्र?
पाकिस्तानने शाहीन-III क्षेपणास्त्राने २००० किमी दूर कोलकातावर हल्ल्याची धमकी दिली आहे. हे क्षेपणास्त्र अणुबॉम्ब वाहून नेऊ शकते आणि संपूर्ण भारताला लक्ष्य करू शकते. या मिसाइलच्या रेंजमध्ये कोलकाता, दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूर, अगदी अंदमान आणि निकोबार बेटेसुद्धा टप्प्यात येतात. शाहीन-३ याशिवाय पाकिस्तानकडे भारताच्या वेगवेगळ्या भागांना लक्ष्य करू शकणारी इतरही अनेक क्षेपणास्त्रे आहेत.
सखी: डायबिटीस असणाऱ्यासाठी कलिंगड दिवसभरात किती-कोणत्या वेळी खावं?
अनेकजण भीतीमुळे कलिंगड खात नाही, तर काही जण अतिप्रमाणात खाऊन रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवून घेतात. डायबिटीस असणाऱ्यांनी दिवसभरात किती वेळा आणि कोणत्या वेळी कलिंगड खायला हवं.
पुणे: पुणे शहरातील पूरस्थितीवरून ठाकरे-वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा
पुणे : शहर व परिसरात तीन दिवस झालेल्या विशेषतः गुरुवारी झालेल्या पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले, नागरिकांच्या घरांत, दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले, मोठ्या प्रमाणात झाडे पडली. अंगावर झाड पडल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे नेते व माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि काँग्रेस नेते व विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. समाजमाध्यमांतील ‘एक्स’ हॅण्डलवर त्यांनी टीका केली आहे.
आंतरराष्ट्रीय: पाकिस्तानचं रचलं कुभांड, भारताला दिली धमकी; कोलकाता टार्गेट?
जर भारताने कुठलेही 'फॉल्स फ्लॅग' ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानचं प्रत्युत्तर कोलकात्यापर्यंत पोहोचेल अशी पोकळ धमकी ख्वाजा आसिफ यांनी भारताला दिली. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच केलेल्या विधानावरून आसिफ यांनी उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानने जवळपास ३००-४०० ड्रोन्स आणि अनेक मिसाइल हल्ले करत दिल्ली, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना भूजसारख्या शहरांना टार्गेट केले होते.
पुणे: पुण्यात विकासकामांचा फटका: झाडांची मुळे धोक्यात, हजारो झाडे दरवर्षी कोसळतात
पुण्यातील विकासकामे आणि खोदकामामुळे झाडांची मुळे कमकुवत झाली आहेत, ज्यामुळे झाडे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. एका घटनेत महिलेचा मृत्यू झाला. शहरातील झाडे वाचवण्यासाठी सर्वेक्षण, योग्य छाटणी आणि बांधकामादरम्यान संरक्षणाची गरज आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय: इराणमध्ये अमेरिकेचं धाडसी बचाव मोहीम; १९७९ ची पुनरावृत्ती टळली?
अमेरिकेने इराणमध्ये दोन वैमानिकांची सुखरूप सुटका केली आहे. १०० कमांडो, १२ हेलिकॉप्टरच्या मदतीने हे बचावकार्य झाले. १९७९ सारखी परिस्थिती टाळण्यासाठी अमेरिकेने मोठी मोहिम फत्ते केली. या रेस्क्यू ऑपरेशनसाठी अमेरिकेने आपली सर्व ताकद पणाला लावली. याचे काही व्हिडिओही समोर आलेत. ज्यात इराणी पोलीस अमेरिकन हेलिकॉप्टर्सवर अंदाधुंद गोळीबार करताना दिसते तर दुसरीकडे अमेरिकन सैन्य त्यातून स्वत:ला वाचवत आपल्या सहकाऱ्याचा शोध घेत होते.
पुणे: ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेतली असती तर रंजना गिरींचे प्राण वाचले असते
पुणे : शहरातील ५८ लाख ५६१ झाडांपैकी तब्बल ४४ हजार ५०० झाडे धोकादायक असून, पाच वर्षांत झाडपडीमुळे किती नागरिकांचा मृत्यू झाला. यांसह नशीब बलवत्तर असल्याने फर्ग्युसन रस्त्यावर महाविद्यालयीन तरुणींचे प्राण वाचले, यासंबंधीचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने ५ मार्च रोजी दिले होते. या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक झाडे आणि धोकादायक फांद्यांचा योग्य बंदोबस्त केला असता तर सिंहगड रस्त्यावरील फुलविक्रेत्या रंजना नवनाथ गिरी यांचे प्राण वाचले असते. त्यामुळे आतातरी महापालिका प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
पुणे: राज्यात भाडेकरार नोंदणीचा विक्रम; महसुलातही मोठी वाढ
पुणे : राज्यातील भाडेकरार नोंदणीमध्ये गेल्या आर्थिक वर्षात लक्षणीय वाढ झाली असून, एकूण १५ लाख ३१ हजार ७०५ दस्त नोंदवले गेले आहेत. या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल ३४४ कोटी ५३ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १ लाख ७८ हजार ५२२ भाडेकरारांची भर पडली असून, महसुलातही ४२ कोटी ९ लाख रुपयांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण नोंदणीत पुणे शहराचा वाटा सर्वाधिक ३० टक्के असून पुणे ग्रामीणचा समावेश केल्यास हा वाटा तब्बल ४० टक्क्यांपर्यंत पोहोचतो.