उदयनराजे अन् नरेंद्र एकाच व्यासपीठावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:03 IST2019-04-04T13:02:30+5:302019-04-04T13:03:15+5:30

लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील हे शोकसभेच्या निमित्ताने साताºयात गुरुवारी एकाच व्यासपीठावर एकत्र

Udayanraje and Narendra on the same platform | उदयनराजे अन् नरेंद्र एकाच व्यासपीठावर

उदयनराजे अन् नरेंद्र एकाच व्यासपीठावर

ठळक मुद्देशोकसभेमध्ये मनोगत व्यक्त करताना दोघांनीही मान्यवरांच्या यादीमध्ये नावे घेतली

सातारा : लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील हे शोकसभेच्या निमित्ताने साताºयात गुरुवारी एकाच व्यासपीठावर एकत्र आले.

रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष दिवंगत किशोर तपासे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासमवेत उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील एकत्र दिसून आले; पण या दोघांच्यामध्ये मंत्री आठवले बसले होते. व्यासपीठावर आल्यानंतर दोघेही एकमेकांसोबत बोलले नाहीत. मात्र, शोकसभेमध्ये मनोगत व्यक्त करताना दोघांनीही मान्यवरांच्या यादीमध्ये नावे घेतली. शोकसभा संपल्यानंतर दोघेही नेते तेथून निघून गेले.

यावेळी रिपाइंचे अविनाश म्हातेकर, अशोक गायकवाड,  काकासाहेब खंकाळ, राजाभाऊ सर्वेदे, पुरुषोत्तम जाधव, परशुराम वाडेकर, संदीप शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Udayanraje and Narendra on the same platform