फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
By संतोष कनमुसे | Updated: November 17, 2025 16:28 IST2025-11-17T16:27:24+5:302025-11-17T16:28:05+5:30
राज्यात नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. काही ठिकाणी महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे, तर काही ठिकाणी शिवसेना विरोधात भाजपा अशी लढत होत असल्याचे दिसत आहे.

फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
राज्यात नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. काही ठिकाणी महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे, तर काही ठिकाणी शिवसेना विरोधात भाजपा अशी लढत होत असल्याचे दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील फलटणच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत आली आहे. नगरपालिका निवडणुकीत आता पुन्हा एकदा रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी लढत होणार आहे.
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे. तर भाजपाकडून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता फलटणमध्ये पुन्हा एकदा रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.
अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाच त्यांचे चिरंजीव शिवसेनेतून निवडणूक लढवत आहेत. फटलणमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे.
भाजपाकडून ऐनवेळी माजी खासदार रणजितसिंहा नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून दिलीपसिंह भोसले यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण ऐनवेळी भाजपाने उमेदवारी बदलली. दरम्यान, आता विधानसभेनंतर पुन्हा एकदा रामराजे नाईक निंबाळकर विरोधात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मैदानात असणार आहेत.