Satara: विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनीच लावला डीजे, फलटणमधील प्रकाराने नागरिकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 15:24 IST2025-09-08T15:23:58+5:302025-09-08T15:24:30+5:30

मिरवणुकीपूर्वी फलटण पोलिसांनी ‘डीजे वाजवाल तर कारवाईला सामोरे जाल’ असा इशारा दिला होता

Police hired DJ for immersion procession in Phaltan satara district | Satara: विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनीच लावला डीजे, फलटणमधील प्रकाराने नागरिकांमध्ये संताप

संग्रहित छाया

फलटण : गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी फलटण पोलिसांनी ‘डीजे वाजवाल तर कारवाईला सामोरे जाल’ असा इशारा दिला होता. यावेळी कोणत्या कोणत्या कलमानुसार कारवाई केली जाईल, हेही अधोरेखित केले. प्रत्यक्षात शनिवारी झालेल्या विसर्जन मिरवणुकांत पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजे वाजला. त्यावर कहर म्हणजे रविवारी रात्री पोलिसांनीच त्यांच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविला.

फलटण पोलिसांनी पोलिस ठाण्यात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. त्यांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करताना रविवारी स्वतःच डीजे लावून कर्णकर्कश गाण्यांवर नाचण्यासाठी ताल धरला होता. फलटणला नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांनी कायदा व सुव्यवस्थेची चुणूक दाखवली आहे. 

फलटण पोलिसांची डीजे व लेझर लाइटविरुद्ध कारवाई करण्याची घोषणा हवेतच विरली आहे. विशेष म्हणजे, फलटणच्या पोलिसांनी कारवाई करावी, यासाठी समाजमाध्यमांवर घेतलेल्या मतदानात ७३ टक्के नागरिकांनी कौल दिला होता. असे असतानाही स्वत:च विसर्जन मिरवणुकीत डीजे लावल्याने नागरिकांवर कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली.

कापूस खरेदीसाठी गर्दी

शनिवारी झालेल्या मिरवणुकीत डीजेच्या आवाजापासून संरक्षण व्हावे म्हणून कापसाचे बोळे कानात घातले जात होते. कापूस खरेदी करण्यासाठी मेडिकल दुकानात गर्दी झाली होती.

Web Title: Police hired DJ for immersion procession in Phaltan satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.