Satara Crime: वाई हत्याकांडातील ज्योती मांढरेला जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:01 IST2025-07-25T16:00:37+5:302025-07-25T16:01:33+5:30

गर्भवती असल्याने स्वतःची काळजी घेण्यासाठी जामीन मिळावा, असा अर्ज ज्योतीने न्यायालयात केला होता

Jyoti Mandhare granted bail in Wai murder case | Satara Crime: वाई हत्याकांडातील ज्योती मांढरेला जामीन मंजूर

Satara Crime: वाई हत्याकांडातील ज्योती मांढरेला जामीन मंजूर

वाई : वाई खूनखटल्यातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर व पन्नास हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मेहेरे यांनी जामीन मंजूर केला. गर्भवती असल्याने स्वतःची काळजी घेण्यासाठी जामीन मिळावा, असा अर्ज ज्योतीने न्यायालयात केला होता. त्याला न्यायालयाने मंजुरी दिली.

या खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मेहेरे यांच्यासमोर सुरू आहे. मागील सुनावणीच्या वेळी ज्योती मांढरेच्या जामिनाची मुदत संपल्याने तिने न्यायालयासमोर शरणागती पत्करली होती. न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. बुधवारी (दि.२३) झालेल्या सुनावणीच्या वेळी गर्भवती असल्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. यावर सरकार पक्षाने जामीन देण्यास हरकत नसल्याचे न्यायालयास सांगितल्याने संशयित आरोपी संतोष पोळ याने हरकत घेतली. त्याने ज्योती मांढरे हिच्यावर अनेक आरोप केले.

सहायक सरकारी वकील ॲड. मिलिंद ओक यांनी बाजू मांडली. मांढरेचे वकील विक्रम काकडे यांनी म्हणणे मांडले. पोळच्या वतीने ॲड. हृषीकेश सकुंडे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व पन्नास हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Web Title: Jyoti Mandhare granted bail in Wai murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.