Satara: ढगफुटी सदृश पाऊस; वाईतील रस्त्यांना आले नदीचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 16:51 IST2025-06-07T16:44:33+5:302025-06-07T16:51:20+5:30

विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी

Cloudburst like rain in Wai city and taluka satara Roads take on the form of a river | Satara: ढगफुटी सदृश पाऊस; वाईतील रस्त्यांना आले नदीचे स्वरूप

Satara: ढगफुटी सदृश पाऊस; वाईतील रस्त्यांना आले नदीचे स्वरूप

वाई : वाई शहरासह तालुक्यात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले. अचानक विजेच्या कडकडाटाला सुरुवात झाली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार आलेल्या पावसामुळे वाईच्या भाजी मंडईसह शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली. रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते.

जोरदार वादळी पावसामुळे शेतात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने भाजीपाला तसेच मशागत केलेल्या शेतात काही ठिकाणी पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले आहे. बावधन नाक्यावर बावधनला जाणाऱ्या रस्त्यावर नाल्या मधून मोठ्या प्रमाणावर पाणी व राडारोडा रस्त्यावर आला. समस्या अनेक वेळा होत असल्याने नागरिकांनी त्या ठिकाणी आरसीसी पूल करण्याची मागणी केली आहे. वाई शहरात जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागले. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने नागरिक भयग्रस्त झाले.

चिखल, घाण रस्त्यावर

वाई शहरात दुपारी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने गटारे भरून वाहून सर्व रस्त्यावर पाणीच पाणी झाले. यामुळे वाहनचालक धोका पत्करून त्यामधून वाट काढत होते. रस्त्यावर पाणी पाणी झाल्यावर चिखल व घाण रस्त्यावर आली. तरी ड्रेनेज सिस्टीम चांगली करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Cloudburst like rain in Wai city and taluka satara Roads take on the form of a river