मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता त्यांना गुंड वाटत आहेत - गुलाबराव पाटील  

By प्रमोद सुकरे | Updated: February 6, 2024 19:52 IST2024-02-06T19:52:03+5:302024-02-06T19:52:33+5:30

मंत्री गुलाबराव पाटील, म्हणाले उध्दव ठाकरे हे गद्दारांना गाढण्याची भाषा गेल्या दीड दोन वर्षांपासून बोलत आहेत.

Chief Minister Eknath Shinde now feels like a gangster says Gulabrao Patil | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता त्यांना गुंड वाटत आहेत - गुलाबराव पाटील  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता त्यांना गुंड वाटत आहेत - गुलाबराव पाटील  

कराड: एकनाथ शिंदे जेव्हा सोबत होते तेव्हा त्यांना साधुसंत वाटत होते. आता ते त्यांच्या सोबत नसल्याने त्यांना गुंड वाटत आहेत का? असा सवाल मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना केला. मंत्री गुलाबराव पाटील मंगळवारी कराड दौऱ्यावर असताना विमानतळावर त्यांना माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्या फोटो ट्वीट वरून छेडले असता मंत्री पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मंत्री गुलाबराव पाटील, म्हणाले उध्दव ठाकरे हे गद्दारांना गाढण्याची भाषा गेल्या दीड दोन वर्षांपासून बोलत आहेत. पण त्यांना कोणी महत्त्व देत नाही. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. ते आजवर त्यांच्या प्रश्नासाठी लढत आले आहेत. लढत राहतील पण ते वेगळा पक्ष काढण्याचा चुकीचा निर्णय घेणार नाहीत.असेही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर दिले.

Web Title: Chief Minister Eknath Shinde now feels like a gangster says Gulabrao Patil