अज्ञात वाहनाची बुलेटला धडक, 28 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 13:34 IST2022-08-07T13:31:56+5:302022-08-07T13:34:09+5:30

तुळजाराम आप्पासाहेब कोळी (वय २८वर्षे) रा. नांदगाव ता. सातारा असे मृत युवकाचे नाव आहे. 

An unknown vehicle hit the bullet, the youth on the bike died on the spot in nagthane satara | अज्ञात वाहनाची बुलेटला धडक, 28 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाची बुलेटला धडक, 28 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू

सातारा/नागठाणे - पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री कऱ्हाडकडे जाणाऱ्या मार्गिकेवर भरतगाववाडी गावचे हद्दीत दुचाकी आणि अज्ञात वाहनाच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला आहे. तुळजाराम आप्पासाहेब कोळी (वय २८वर्षे) रा. नांदगाव ता. सातारा असे मृत युवकाचे नाव आहे. 

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री सातारा बाजूने कऱ्हाडकडे जाणाऱ्या मार्गिकेवर भरतगाववाडी गावचे हद्दीतील राजमार्ग हॉटेलचे समोरून हा युवक भरधाव वेगाने बेदकरकारपणे बुलेट दुचाकी घेऊन जात असताना पुढे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनास त्याने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यामध्ये तो स्वतः जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे विजय देसाई, प्रकाश वाघ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून त्यास पुढील कामकाजासाठी नागठाणे आरोग्य केंद्रात पाठवले. घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार विजय देसाई करत आहेत.

Web Title: An unknown vehicle hit the bullet, the youth on the bike died on the spot in nagthane satara