Accident: चारचाकी गाडीला भीषण अपघात, रुग्णालयात नेताना तिघांचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 10:17 IST2022-08-01T10:16:50+5:302022-08-01T10:17:41+5:30

Accident: याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी आर्वी येथील तिघेजण न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने वकिलांना भेटायला सातारा येथे गेले होते

Accident: Horrible four wheeler accident, all three died while being taken to hospital in satara surli | Accident: चारचाकी गाडीला भीषण अपघात, रुग्णालयात नेताना तिघांचाही मृत्यू

Accident: चारचाकी गाडीला भीषण अपघात, रुग्णालयात नेताना तिघांचाही मृत्यू

सातारा/रहिमतपूर : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील सुर्ली येथे रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहन चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत आर्वी येथील तिघेजण ठार झाले आहेत. या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली. तुकाराम आबाजी माने वय ६५, तानाजी आनंद माने वय ६२, सुभाष गणपत माने वय ६० सर्व रा.आर्वी, ता. कोरेगाव अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी आर्वी येथील तिघेजण न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने वकिलांना भेटायला सातारा येथे गेले होते. रात्री गावी परतत असताना दहा वाजण्याच्या सुमारास इर्टिका गाडी चालक सुभाष माने यांचा सुर्ली गावच्या हद्दीतील वाठार बाजूकडे रस्त्यावर असलेल्या वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये गाडीचे पुढचे तोंड पूर्णपणे उचकटलेले आहे. अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच वाठार येथील काही युवकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे घेऊन निघाले होते. मात्र, रस्त्यातच तिघाही जखमींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे आर्वी गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद रहिमतपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
 

Read in English

Web Title: Accident: Horrible four wheeler accident, all three died while being taken to hospital in satara surli