Sangli: मिरजेत पाचशेच्या बनावट नोटासह तरुण अटकेत, ४२ हजारांच्या नोटा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 19:01 IST2025-10-10T19:00:52+5:302025-10-10T19:01:48+5:30
नोटा बाजारात खपविण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले

Sangli: मिरजेत पाचशेच्या बनावट नोटासह तरुण अटकेत, ४२ हजारांच्या नोटा जप्त
मिरज : मिरजजवळील निलजी-बामणी रोडवरील पुलाजवळ ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणास पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
सुप्रीत कडप्पा देसाई (वय २२, रा. इदरगुच्ची, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) याच्याकडून खऱ्या नोटांसारख्या असलेल्या पाचशे रुपयांच्या ८४ बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. बुधवारी दुपारी दोन वाजता महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली.
संशयित देसाई हा बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी राजेंद्र हारगे यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.