“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 05:45 IST2024-10-12T05:44:57+5:302024-10-12T05:45:09+5:30

प्रणिती शिंदे म्हणाल्या, हरयाणामधील काठावरच्या पराभवातून आम्ही खूप शिकलो आहोत. तेथील उणिवा दूर करून महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची बांधणी सुरू आहे. 

what happened in haryana will never happen in maharashtra said congress praniti shinde | “हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे

“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : महाराष्ट्रात ईव्हीएमसोबत नाटक करण्याची हिंमत कुणाचीच नाही. यामुळे हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, असा विश्वास सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी सांगलीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला. 

सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी त्या सांगलीत आल्या होत्या. शिंदे म्हणाल्या, हरयाणामधील काठावरच्या पराभवातून आम्ही खूप शिकलो आहोत. तेथील उणिवा दूर करून महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची बांधणी सुरू आहे. 

Web Title: what happened in haryana will never happen in maharashtra said congress praniti shinde