Sangli Municipal Election 2026: भाजपकडून २० दिग्गजांचा पत्ता कट, संभाव्य उमेदवारांची यादी...जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:50 IST2025-12-29T18:47:37+5:302025-12-29T18:50:02+5:30
अर्ज दाखल करण्याच्या सूचना

Sangli Municipal Election 2026: भाजपकडून २० दिग्गजांचा पत्ता कट, संभाव्य उमेदवारांची यादी...जाणून घ्या
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार यादीवर रविवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. दुपारनंतर संभाव्य उमेदवारांना भाजपकडून अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. पण, अधिकृत उमेदवार यादी मात्र जाहीर केली नाही. सोमवारी उमेदवारांना एबी फाॅर्म देण्यात येणार आहे. भाजपकडून अनेक माजी नगरसेवकांसह २० दिग्गजांचे पत्ते कापण्यात आले आहेत.
भाजपने उमेदवार यादीबाबत सावध पवित्रा घेतला होता. त्यात उमेदवारी वाटपावरून भाजपअंतर्गत वाद उफाळून आला. पक्षात नव्याने आलेल्या जयश्री पाटील व पृथ्वीराज पाटील समर्थकांना जागा देताना निष्ठावंतावर अन्याय होणार नाही, याची दक्षता भाजपला घ्यावी लागत होती. त्यातून पक्षाअंतर्गत वाद टोकाला पोहोचला. उमेदवारीचा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कोर्टात पोहोचला. मुंबईतील बैठकीतही जोरदार वादावादी झाली. त्यात राष्ट्रवादीने (अजित पवार) सवतासुभा मांडल्याने भाजपची गणिते बिघडली होती.
चार ते पाच दिवसांतील चर्चेच्या गुऱ्हाळानंतर अखेर भाजपने उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या यादीतून अनेक माजी नगरसेवकांना धक्का देण्यात आला. त्यांचा पत्ता कट झाला आहे. तसेच भाजपमधील निष्ठावंत व दिग्गज कार्यकर्त्यांनाही उमेदवार देण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहेत.
संभाव्य उमेदवार असे-
प्रभाग एकमधून ऋषीकेश सूर्यवंशी, पद्मश्री पाटील, रवींद्र सदामते, प्रभाग दोनमधून प्रकाश ढंग, प्रदीप पाटील, प्रभाग आठमधून संजय पाटील, दीपक वायदंडे, प्रभाग नऊमधून संतोष पाटील, रोहिणी पाटील, अतुल माने, वर्षा सरगर, प्रभाग दहामधून जगन्नाथ ठोकळे, प्रकाश मुळके, गीता पवार, प्रभाग अकरामधून मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, संजय कांबळे, सविता संतोष रुपनर, प्रभाग बारामधून धीरज सूर्यवंशी, संजय यमगर, प्रभाग चौदामधून अनिता हणमंत पवार, उदय बेलवलकर, मनीषा संदीप कुकडे, प्रभाग सोळामधून उत्तम साखळकर, स्वाती शिंदे, प्रदीप ऊर्फ गजू बन्ने, विद्याताई दानोळे, प्रभाग सतरामधून प्रशांत पाटील, गीतांजली ढोपे पाटील, लक्ष्मण नवलाई, मालन गडदे, प्रभाग अठरामधून शैलेश पवार, वैशाली राजू गवळी, बिस्मिला शेख, गाता जगदाळे, प्रभाग १९ मधून संजय कुलकर्णी, सविता मदने, अलका ऐवळे, कीर्ती देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
यांचा पत्ता कट?
भाजपमधून अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट झाला आहे. यात माजी उपमहापौर युवराज बावडेकर, माजी गटनेते विनायक सिंहासने, अनारकली कुरणे, कल्पना कोळेकर, राजेंद्र कुंभार, अप्सरा वायदंडे, सोनाली सगरे, सुनंदा राऊत, भारती दिगडे, या माजी नगरसेवकांसह अमोल गवळी, पूजा खांडेकर, रौनक शहा, विश्वजित पाटील, सुजित काटे, सुजित राऊत, आशा शिंदे, नितीन शिंदे, दरिबा बंडगर, प्रतिभा दीपक माने या दिग्गजांचाही उमेदवार यादी समावेश नसल्याचे सांगण्यात येत आहे.
काही जागांवर अद्यापही चर्चा
प्रभाग १५ मधील चारही जागांवर भाजपमध्ये अजून खलबते सुरू आहेत. त्याशिवाय गावभागामधील दोन जागांवरही उमेदवारीचा पेच अडकला आहे. इतर प्रभागातील उमेदवारांची यादी मात्र भाजपने अंतिम केल्याचे सांगण्यात येत आहे.