Sangli Municipal Election 2026: सांगलीत शिंदेसेनेकडून स्वबळाचा नारा; ६५ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:58 IST2026-01-01T18:56:36+5:302026-01-01T18:58:20+5:30
शिंदेसेनेत एबी फॉर्म देण्यावरून मंगळवारी गोंधळ उडाला होता

Sangli Municipal Election 2026: सांगलीत शिंदेसेनेकडून स्वबळाचा नारा; ६५ उमेदवार रिंगणात
सांगली : महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेच्या उमेदवारांना महायुतीमध्ये जागा न दिल्यामुळे त्यांनी स्वबळाचा नारा दिला. शिंदेसेनेने ६५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. शिंदेसेनेत एबी फॉर्म देण्यावरून मंगळवारी गोंधळ उडाला होता. त्यामुळे बुधवारी ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
जागा वाटपावरून भाजप आणि शिंदेसेनेची चर्चा फिस्कटल्यामुळे अखेरच्या क्षणी शिंदेसेनेने सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. अखेर त्यांना ६५ जागांवर उमेदवार उभे करण्यात यश आले आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने ५७ जागा लढवल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत ८ जागा वाढवून उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी भाजपबरोबर शिंदेसेनेची युती असताना सांगलीत देखील युती होईल अशी शक्यता होती. शिंदेसेनेने १५ जागांची मागणी महायुतीमधून केली होती. त्यासाठी जिल्ह्यातील नेते मंडळींनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती. परंतू उशिरापर्यंत जागा वाटपाबाबत चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे शिंदेसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी सर्व जागा स्वबळावर लढवाव्यात, अशी मागणी केली. त्यानुसार शिंदेसेनेने सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्याची तयारी केली.
प्रभागनिहाय उमेदवार असे :
प्रभाग १ : अनिल मोहिते, पायल गोसावी, रेश्मा तुपे, सुप्रिया देशमुख, संदीप तुपे.
प्रभाग २ : अनिता वनखंडे, सिद्राम दळवे, शमाबी मुजावर, विनायक यादव.
प्रभाग ३ : सागर वनखंडे.
प्रभाग ४ : शुभांगी रूईकर, मुग्धा गाडगीळ, गजानन मोरे.
प्रभाग ५ : निर्मला घोडके, रुक्मिणी अंबिगेरी, अमानुल्ला सय्यद, चंद्रकांत मैगुरे.
प्रभाग ६ : जीनत काझी, इस्माईल कुरणे.
प्रभाग ७ : सुनीता कोकाटे, आनंदसिंग राजपूत, लतिका शेगणे, विलास देसाई.
प्रभाग ८ : महेश सागरे, जिजाई लेंगरे, नीता शिंदे, स्वप्निल औंधकर.
प्रभाग ९ : सुरेश टेंगले, उषाताई गायकवाड, रवींद्र ढगे.
प्रभाग १० : विद्या कांबळे, नवीनचंद मोरकाणे, माधुरी अरवाळे, विशाल पाटील.
प्रभाग ११ : सुजीतकुमार काटे, माया लेंगरे, सुप्रिया साळुंखे.
प्रभाग १२ : गोदावरी चवरे, छाया पांढरे.
प्रभाग १३ : योगिता कांबळे, उषा मोरे.
प्रभाग १४ : वैशाली बनसोडे, शीतल सदलगे, सुकन्या व्रतेश खाडीलकर, युवराज बावडेकर.
प्रभाग १५ : अविनाश चिनके, आरती वळवडे, आम्रपाली कांबळे, सुजीत लोखंडे.
प्रभाग १६ : सतीश नाईक, बेबी बारगीर, आशिष साळुंखे.
प्रभाग १७ : बसवराज पाटील, मयूरी शिंदे, मृणाल पाटील, नानासाहेब शिंदे.
प्रभाग १८ : अर्जुन कांबळे, सुजाता बन्ने, मीनाक्षी भोसले.
प्रभाग १९ : रंजना कांबळे, बाळासाहेब माने, सुनीता मोरे, अरूण चव्हाण.
प्रभाग २० : सुहाना नदाफ, विकास सूर्यवंशी, वाजीद खतिब.