Sangli: पावसामुळे कुसाईवाडी येथील बंधारा फुटला, हूंबरवाडी-धुरंदेवाडीचा संपर्क तुटला; शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:48 IST2025-06-14T18:47:14+5:302025-06-14T18:48:53+5:30

वन विभागाने बांधला होता बंधारा

The dam built by the forest department at Kusaiwadi Humbarwadi in Shirala taluka sangli burst due to rain. | Sangli: पावसामुळे कुसाईवाडी येथील बंधारा फुटला, हूंबरवाडी-धुरंदेवाडीचा संपर्क तुटला; शेतीचे नुकसान

Sangli: पावसामुळे कुसाईवाडी येथील बंधारा फुटला, हूंबरवाडी-धुरंदेवाडीचा संपर्क तुटला; शेतीचे नुकसान

शिराळा : कुसाईवाडी-हूंबरवाडी (ता. शिराळा) येथील वन विभागाने बांधलेला बंधारा गुरुवारी (दि.११) झालेल्या पावसामुळे रात्री फुटला. बंधारा फुटल्याने येथील शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे रस्ता वाहून गेल्याने हूंबरवाडी व धुरंदेवाडी या दोन्ही वाडींतील संपर्क तुटला आहे.

काही दिवसांपूर्वी आलेल्या मोठ्या पावसानंतर इथल्या रस्त्याचा भरावा वाहून गेला होता. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु, गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने मातीचा कच्चा बंधारा फुटला आहे. पाण्याचा मोठ्या प्रवाहामुळे रस्ता वाहून गेला. बंधारा फुटल्यामुळे बंधाऱ्याखाली असणाऱ्या शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हूंबरवाडी व धुरंदेवाडी या दोन्ही वाडीतील एकमेकांचा जवळपास पाचशे पेक्षा जास्त नागरिकांचा संपर्क तुटला आहे. 

वाचा- सांगली जिल्ह्यात दहा मंडळात अतिवृष्टी; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका

घटनास्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई मिळण्याबाबत पाठपुरावा करू असे सांगितले. यावेळी सरपंच शितल मुदगे, विनोद पन्हाळकर, बाजीराव खोत, मनोज दळवी, मच्छिंद्र पवार, बाजीराव सपकाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कारवाई करण्याचे आश्वासन

रणधीर नाईक यांनी उपवनसंरक्षक नीता कट्टे यांना फोन वरून या घटनेबाबत कल्पना दिली. नीता कट्टे यांनी संबंधित घटनेबाबत घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवून माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू, असे सांगितले.

Web Title: The dam built by the forest department at Kusaiwadi Humbarwadi in Shirala taluka sangli burst due to rain.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.