Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत स्ट्राईक रेटमध्ये काँग्रेस आघाडीवर; भाजप अर्धशतकावर

By अशोक डोंबाळे | Updated: January 17, 2026 19:50 IST2026-01-17T19:49:27+5:302026-01-17T19:50:09+5:30

शिंदेसेनेने खाते खोलले, पण स्ट्राईक रेट केवळ ३.२३ टक्केच : जयंत पाटील यांची खेळी फसली

Sangli Municipal Election Results 2026 Congress leads in strike rate in Sangli BJP on half century mark | Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत स्ट्राईक रेटमध्ये काँग्रेस आघाडीवर; भाजप अर्धशतकावर

Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत स्ट्राईक रेटमध्ये काँग्रेस आघाडीवर; भाजप अर्धशतकावर

अशोक डोंबाळे

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या या रणधुमाळीत विजय-पराभवाइतकेच नेत्यांच्या राजकीय खेळींची चर्चा रंगली आहे. स्ट्राईक रेटच्या आकडेवारीने अनेकांचे डाव उघडे पाडले असून, काँग्रेसचे खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजित कदम यांची रणनीती प्रभावी ठरली, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांची राजकीय खेळी अयशस्वी ठरल्याचे चित्र आहे.

भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या असल्या तरी ७८ पैकी त्यांना ३९ जागा मिळाल्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट ५० टक्केच राहिला आहे. अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसल्याचेही या निकालातून स्पष्ट झाले.

काँग्रेसने ३२ पैकी १८ जागा जिंकून तब्बल ५६.२५ टक्के स्ट्राईक रेट नोंदविला. उमेदवार निवडीपासून प्रचारयंत्रणेमध्ये विशाल पाटील आणि डॉ. विश्वजित कदम यांनी आखलेली व्यूहरचना अचूक ठरली. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची मोट बांधणे, मतदारांशी थेट संवाद आणि विरोधकांची कोंडी करणारे नियोजन यामुळे काँग्रेसला अनपेक्षित झेप घेता आली.

भाजपने ७८ पैकी ३९ जागा मिळवीत ५० टक्के स्ट्राईक रेट गाठला असला, तरी अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक ठिकाणी उमेदवारीवरून उफाळलेली नाराजी, अंतर्गत गटबाजीमुळे भाजपचे हक्काचे बालेकिल्लेही ढासळले. पक्षाची संघटनात्मक ताकद असूनही समन्वयाचा अभाव महागात पडल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीत मात्र चित्र उलटे राहिले. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने ३६ पैकी १६ जागा जिंकत ४४.४४ टक्के स्ट्राईक रेट मिळविला, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला केवळ २० पैकी ३ जागा मिळाल्या; त्यांचा स्ट्राईक रेट अवघा १५ टक्के राहिला. 

शिंदेसेनेने महानगरपालिका निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळवून खाते उघडले आहे. पण, सर्वाधिक ६२ जागा लढवून केवळ दोन जागांवर विजय मिळाल्याने ३.२३ टक्के इतका स्ट्राईक रेट त्यांचा राहिला आहे.

पक्षनिहाय स्ट्राईक रेट

पक्ष /लढविल्या जागा/ विजयी / विजयाची टक्केवारी
काँग्रेस / ३२ / १८ / ५६.२५
भाजप / ७८/ ३९/ ५०
राष्ट्रवादी (अजित पवार) / ३६/ १६/ ४४.४४
राष्ट्रवादी (शरद पवार) / २०/ ०३/ १५
शिंदेसेना /६२/२/ ३.२३

Web Title : सांगली नगर पालिका चुनाव 2026: कांग्रेस स्ट्राइक रेट में आगे; भाजपा पचास पर।

Web Summary : सांगली नगर पालिका चुनाव में कांग्रेस 56.25% स्ट्राइक रेट के साथ आगे रही। भाजपा ने सबसे अधिक सीटें हासिल कीं लेकिन 50% स्ट्राइक रेट रहा। राकांपा (अजित पवार) को 44.44% मिला, जबकि राकांपा (शरद पवार) 15% पर पिछड़ गई। शिंदे सेना का स्ट्राइक रेट केवल 3.23% रहा।

Web Title : Sangli Municipal Elections 2026: Congress leads in strike rate; BJP at fifty.

Web Summary : In Sangli's municipal elections, Congress excelled with a 56.25% strike rate. BJP secured the most seats but had a 50% strike rate. NCP (Ajit Pawar) got 44.44%, while NCP (Sharad Pawar) lagged at 15%. Shinde Sena's strike rate was a mere 3.23%.