Sangli Politics: विधानसभा मतदारसंघ फेररचनेत मिरज यापुढे राखीव राहणार नाही - मंत्री मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:39 IST2025-06-24T18:38:38+5:302025-06-24T18:39:52+5:30
सांगली महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू

Sangli Politics: विधानसभा मतदारसंघ फेररचनेत मिरज यापुढे राखीव राहणार नाही - मंत्री मुश्रीफ
मिरज : विधानसभा मतदारसंघ फेररचनेत मिरज विधानसभा मतदारसंघ यापुढे राखीव राहणार नाही. त्यामुळे मिरजेचा पुढील विधानसभेचा आमदार राष्ट्रवादीचा निवडून द्या, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
मिरजेत सोमवारी आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेचे मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे, शिंदेसेनेचे मिरज शहरप्रमुख विजय शिंदे, भाजपचे ईश्वर जनवाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
हसन मुश्रीफ म्हणाले की, मिरज व सांगली दोन्ही शासकीय रुग्णालये अद्ययावत करून सर्व उपचार येथे होतील. यापुढे कोणत्याही रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागणार नाही. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात, माजी नगरसेविका स्वाती पारधी, महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, मिरज महिला शहराध्यक्ष शीतल सोनवणे, व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगली महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू
राज्यात भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेचे महायुतीचे सरकार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती झाली तर ठीक, नाही तर जेथे युती होणे शक्य नाही. तिथं मात्र मैत्रीपूर्ण लढती कराव्या लागतील. राष्ट्रवादीच्या चिन्हावर स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे लागतील. कोणत्याही परिस्थितीत सांगली महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
यांनी केला पक्षप्रवेश
चंद्रकांत मैंगुरे, नीता आवटी, विजय शिंदे, किरण कांबळे, जब्बार मुजावर, आकाश चव्हाण, डॉ. अमर कुरणे, शुभम साळुंखे, योगेश आवळे, भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ईश्वर जनवाडे, मिरज शहर सरचिटणीस संदीप कबाडे, मालगाव ग्रामपंचायत विद्यमान सदस्य जावेद मुल्ला या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला.