Sangli: इस्लामपुरात मार्केट यार्डमधील एका कंपनीत भीषण आग; लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:23 IST2025-06-05T13:23:03+5:302025-06-05T13:23:23+5:30

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल

Massive fire breaks out in a company in Islampur Market Yard Loss of lakhs | Sangli: इस्लामपुरात मार्केट यार्डमधील एका कंपनीत भीषण आग; लाखोंचे नुकसान

Sangli: इस्लामपुरात मार्केट यार्डमधील एका कंपनीत भीषण आग; लाखोंचे नुकसान

इस्लामपूर : शहरातील मार्केट यार्ड परिसरात आज, गुरुवारी (दि.५) सकाळच्या सुमारास जयंत ट्रेडिंग कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. जुनी आणि प्रतिष्ठित अशी ही कंपनी असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.

ही आग कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर लागली होती. घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. वेळेवर आग विझवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला, अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली.

या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचे कंपनीचे प्रोप्रायटर विकास राजमाने यांनी सांगितले. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा संशय राजमाने यांनी व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे मार्केट यार्ड परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, नगरपालिकेच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.

Web Title: Massive fire breaks out in a company in Islampur Market Yard Loss of lakhs