Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 19:41 IST2024-11-01T19:39:56+5:302024-11-01T19:41:01+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपली असून आता ४ तारखेला अर्ज माघारीसाठी मुदत आहे. राज्यभरात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांनी बंडखोरी केली आहे. आता चार तारखेपर्यंत या नेत्यांना अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत आहे. यामुळे पक्षातील बड्या नेत्यांनी यासाठी बैठका सुरू केल्या असून उमेदवारांची ,समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी अर्ज माघार घेण्यास नकार दिला आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अडचणी वाढhttps://www.lokmat.com/ल्या आहेत. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. जयश्री पाटील यांना आज सांगलीत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाल्या, माझी उमेदवारी ठाम आहे. काँग्रेसच्या प्रभारींनी माझ्यासोबत संवाद साधला. त्यांनी मला एमएलसीसाठी प्रस्ताव ठेवला होता, त्यांनी काँग्रेससोबत राहा असं सांगितले. पण यावेळी मी लढणार आहे. ही जनतेची आणि कार्यकर्त्यांची उमेदवारी आहे. त्यामुळे यावर मी ठाम आहे, असे स्पष्ट मत काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी व्यक्त केले. यामुळे आता काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपाने आमदार सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीने काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. जयश्री पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती, त्यांना पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. यामुळे आता पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
महायुतीला शिराळ्यात दिलासा?
शिराळा विधानसभा मतदारसंघातही महायुतीच्या सम्राट महाडिक यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजपाकडून सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली, यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत अर्ज दाखल केला. दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित सम्राट महाडिक यांची बैठक झाली. या बैठकीनंतर महाडिक अर्ज माघार घेणार का या चर्चा सुरू आहेत. महाडिक यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.