काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत विशाल पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 14:20 IST2024-11-06T14:20:01+5:302024-11-06T14:20:57+5:30

सांगली : काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचार सभेला हजेरी लावून काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी उघडपणे ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MP Vishal Patil in a meeting of rebel Congress candidate Jayashree Patil  | काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत विशाल पाटील 

काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत विशाल पाटील 

सांगली : काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचार सभेला हजेरी लावून काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी उघडपणे पाठबळ दिल्याने पक्षांतर्गत संभ्रम वाढला आहे.

सांगलीत काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली असताना वसंतदादांच्या नातसून जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली. मंगळवारी त्यांनी घेतलेल्या प्रचार सभेला विशाल पाटील यांनी हजेरी लावून सर्वांना धक्का दिला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी करून विशाल पाटील निवडून आले होते. नंतर ते काँग्रेसचे सहयोगी खासदार बनले. आता विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोर उमेदवाराच्या सभेला हजेरी लावून सर्वांना धक्का दिला. 

जिल्ह्यातील काँग्रेसचे अन्य कोणतेही आमदार किंवा प्रमुख पदाधिकारी या सभेला नव्हते. तरीही बंडखोरीला खासदारांनी पाठबळ दिल्याने पक्षांतर्गत संभ्रम वाढला आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MP Vishal Patil in a meeting of rebel Congress candidate Jayashree Patil