काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यावर कर्ज नाही, संपत्ती किती.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:15 IST2024-10-30T16:14:45+5:302024-10-30T16:15:27+5:30

सांगली : काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या नावे ४० कोटी ४२ लाख ८ हजार ८६ रुपयांची ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Congress candidate for Sangli assembly constituency Prithviraj Patil's wealth is 40 crores | काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यावर कर्ज नाही, संपत्ती किती.. वाचा

काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यावर कर्ज नाही, संपत्ती किती.. वाचा

सांगली : काँग्रेसचेसांगली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या नावे ४० कोटी ४२ लाख ८ हजार ८६ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे १ कोटी १९ लाख ६ हजार ४१२ रुपयांची मालमत्ता नोंदली आहे.

शेती व उद्योग असा व्यवसाय त्यांनी दर्शविला आहे. पत्नी या निवृत्त शिक्षिका आहेत. मुलाच्या नावे कोणतीही संपत्ती नसल्याचे नोंदले आहे. कोणत्याही वित्तीय संस्थांच्या कर्जाची नोंदही त्यांच्या नावे दर्शविण्यात आलेली नाही. महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये एका आदेशाचे पालन न केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पृथ्वीराज पाटील यांच्या संपत्तीचे विवरण

  • जंगम मालमत्ता : ९०,०७,२६०
  • स्थावर मालमत्ता ३९,५२,००,८२६


शिक्षण बी.फार्मसीपर्यंत

पृथ्वीराज पाटील यांचे शिक्षण बी. फार्मसीपर्यंत झाले आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली आहे. त्यांच्या नावे कोणतेही कर्ज व शासकीय देणी नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Congress candidate for Sangli assembly constituency Prithviraj Patil's wealth is 40 crores