पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, सांगलीतील जतमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 15:53 IST2023-09-27T15:52:19+5:302023-09-27T15:53:52+5:30

मृत्यूपूर्वी मोबाइलवर एक चित्रफित तयार केली अन् एका व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकली

Husband commits suicide due to wife suffering in Jat Sangli | पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, सांगलीतील जतमधील घटना 

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, सांगलीतील जतमधील घटना 

जत : पत्नीच्या त्रासाला कंटाळून दत्तात्रय निंगाप्पा कोळी (वय ५०) यांनी सोमवारी रात्री विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांची पत्नी, सासू व अन्य दोघांसह चार जणांविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पत्नी सुश्मिता, सासू शोभा शिवगोंडा माळी, बाबुराव कागवाडे व सुनील कागवाडे (सर्व रा. जत) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी दत्तात्रय यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. रुक्मिणी सदाशिव कोळी यांनी फिर्याद दिली. 

दत्तात्रय कोळी दत्त कॉलनीमध्ये राहण्यास होते. मृत्यूपूर्वी त्यांनी मोबाइलवर एक चित्रफित तयार केली आहे. त्यामध्ये आपली पत्नी व तिच्यासोबत असलेल्या कागवाडे नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख केला आहे.

जत पोलिसांत चारवेळा तक्रार करूनही दखल न घेतल्याने कंटाळून आत्महत्या करत असल्याचाही उल्लेख आहे. सासू देखील माझ्या पत्नीलाच साथ देत होती. माझ्या पत्नीमुळे आत्महत्या करीत आहे, असा चित्रफितीत उल्लेख आहे. ही चित्रफित दत्तात्रय यांनी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकली आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही.

Web Title: Husband commits suicide due to wife suffering in Jat Sangli