आषाढी वारीसाठी गुजरात ते मिरज चार विशेष रेल्वेगाड्या, वेळापत्रक कसे.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:24 IST2025-06-27T18:23:42+5:302025-06-27T18:24:10+5:30

मिरज : पंढरपूरला आषाढीवारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी गुजरातमधील उधना ते मिरजदरम्यान पंढरपूरमार्गे विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. दि. ५ व ...

Four special trains from Gujarat to Miraj for Ashadhi Wari | आषाढी वारीसाठी गुजरात ते मिरज चार विशेष रेल्वेगाड्या, वेळापत्रक कसे.. जाणून घ्या

आषाढी वारीसाठी गुजरात ते मिरज चार विशेष रेल्वेगाड्या, वेळापत्रक कसे.. जाणून घ्या

मिरज : पंढरपूरला आषाढीवारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी गुजरातमधील उधना ते मिरजदरम्यानपंढरपूरमार्गे विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. दि. ५ व ६ जुलै रोजी या चार जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.

उधना-मिरज क्रमांक ०९०७९ या विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या होणार आहेत. ही विशेष रेल्वे दि ४ जुलै रोजी उधना येथून रात्री ११:२५ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे ३:५० वाजता सकाळी ६ वाजता मिरजेत पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०९०८० दि. ५ रोजी सकाळी ९:१० वाजता मिरजहून निघेल. पंढरपूर येथे सकाळी ११:५० व दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०० वाजता उधना येथे पोहोचेल. या गाडीस ४ स्लीपर बोगी, १३ जनरल बोगी व १ ब्रेक व्हॅन आहे. 

क्रमांक ०९०८१ विशेष रेल्वे दि. ५ रोजी उधना येथून रात्री ११:२५ वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे दुपारी ३:५० वाजता व सकाळी ६:०० वाजता मिरज येथे पोहोचेल. 

विशेष रेल्वे क्रमांक ०९०८२ दि. ६ रोजी सकाळी ९:१० वाजता मिरजेतून निघेल. पंढरपूर येथे सकाळी ११:५० वाजता व दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०० वाजता उधना येथे पोहोचेल. या गाडीस ६ स्लीपर , १४ जनरल बोगी क्लास, २ गार्ड ब्रेक व्हॅन आहे.

सहाही रेल्वेगाड्यांना मिरज थांबा

या विशेष रेल्वेगाड्यांना बारडोली, व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर व मिरज येथे थांबा आहे.

तीन विशेष गाड्या

आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे दि ०१ ते १० पर्यंत पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर व मिरज ते लातूर अशा तीन आषाढी विशेष गाड्या धावणार आहेत.

असे आहे विशेष गाड्यांचे वेळापत्रक

  • पुणे-मिरज एकेरी विशेष रेल्वे क्रमांक ०१४१३ दि. ०८ रोजी पुणे येथून सकाळी ७:०० वाजता सुटेल व मिरजेत दुपारी १२:३० वाजता पोहोचेल. या गाडीला लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी व सांगली येथे थांबा आहे. 
  • मिरज-नागपूर एकेरी विशेष रेल्वे क्रमांक ०१२१३ दि. ०८ रोजी मिरज येथून दुपारी १२:५५ वाजता सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२:२५ वाजता पोहोचेल. या गाडीला आरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढालगाव-जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, पंढरगाव, चांदगाव, अकोला, मूर्तिजापूर येथे थांबा आहे. 
  • मिरज-लातूर एकेरी विशेष रेल्वे क्रमांक ०१४०९ दि. ०६ रोजी मिरज येथून सकाळी ९:३० वाजता सुटेल व लातूर येथे त्याच दिवशी रात्री ७:२० वाजता पोहोचेल.  

Web Title: Four special trains from Gujarat to Miraj for Ashadhi Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.