सांगलीत प्रभाग क्रमांक १० मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये अदलाबदलीचा आरोप, साडे अकरा वाजेपर्यंत १७.२० टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:47 IST2026-01-15T12:45:12+5:302026-01-15T12:47:19+5:30
राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देत आढावा घेतला.

सांगलीत प्रभाग क्रमांक १० मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये अदलाबदलीचा आरोप, साडे अकरा वाजेपर्यंत १७.२० टक्के मतदान
सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी साडे अकरा वाजेपर्यंत १७.२० टक्के मतदान झाले.. त्यात ४४ हजार ०४० पुरुषांनी तर ३४ हजार १२७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १० मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये अदलाबदलीचा आरोप झाला. सांगलीवाडी, वडर कॉलनी, जामवाडी, संजयनगर येथील बुथवर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत नव मतदारांची मोठा उत्साह दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देत आढावा घेतला.
सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. पहिल्या दोन तासात ६.४५% मतदान झाले होते. चार मतदान करायचे असल्याने मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. मतदार यादीतील घोळामुळे अनेक मतदारांना केंद्र शोधताना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे. तर, अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली गेली आहेत.
मिरजेत १२ वाजेपर्यंत २० टक्के मतदान झाले. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. मतदान प्रक्रिया संथ गती सुरु आहे. जवाहर हायस्कूल येथे बुथवर ईव्हिएम मशीन बंद पडल्याने गोंधळ उडाला. ब्राह्मणपुरी येथील मतदान केंद्रावर आमदार सुरेश खाडे आणि सुमनताई खाडे यांनी मतदान केले. तर, जनसुराज्यचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित दादा कदम यांनीही मतदानाचा हक्क बजावला.