Sangli: पौष महिन्यामुळे फुलांचा बाजार कोमेजला, मागणीअभावी उलाढाल थंडावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:06 IST2025-01-20T14:06:30+5:302025-01-20T14:06:56+5:30

उत्पादकांना गुढीपाडव्याची प्रतीक्षा

Due to lack of demand for flowers during Sankranthi and Paush month, turnover in flower market decreased | Sangli: पौष महिन्यामुळे फुलांचा बाजार कोमेजला, मागणीअभावी उलाढाल थंडावली

संग्रहित छाया

मिरज : संक्रांतीला व पौष महिन्यात फुलांना मागणी नसल्याने मिरजेतील फुलांच्या बाजारात उलाढाल घटली आहे. मागणी नसल्याने मिरजेच्या बाजारात फुलांची आवक कमी आहे. मागणी नसल्याने झेंडू, गुलाब शेवंती, निशिगंध या फुलांचा दर कमी झाला आहे. फुलांना दरासाठी गुढीपाडव्याची प्रतीक्षा आहे.

जानेवारीत पौष महिना सुरू झाल्याने फुलांना मागणी नसल्याने निशिगंध, झेंडू, शेवंती, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, या हरितगृहातील फुलांची आवक कमी झालेली आहे. बाजारात झेंडूचा प्रतिकिलो तीस रुपये आहे. दोनशे रुपये प्रतिकिलो विक्री होणाऱ्या शेवंतीचा दर शंभरावर व निशिगंधाचा दर दोनशेवर आहे. गुलाबाचा दर प्रति शेकडा दोनशेपर्यंत आहे. फुलांचे दर कमी असूनही मागणी नसल्याने बाजारातील उलाढाल घटली आहे.

स्थानिक विक्रीसह मिरजेतून मोठ्या शहरात फुलांची निर्यात होते. मात्र, फुलांना दर व मागणी नसल्याने निर्यातही कमी आहे. यामुळे व्यापारी व फूल उत्पादक शेतकरी फुलांना दरासाठी गुढीपाडव्याची प्रतीक्षा करीत आहेत.

थंडीमुळे उत्पादन घटले 

थंडीमुळे फुलांचे उत्पादन घटले आहे. पौष महिन्यात कोणतेही धार्मिक कार्यक्रम नसल्याने मागणीवर परिणाम झाला आहे. झेंडूचा दर दिवाळीला प्रतिकिलो किलो १५० रुपयांपर्यंत होता. मात्र, आता मागणी नसल्याने झेंडूचा दर पडला आहे.

फुलांचे दर

  • निशिगंध - २०० रुपये किलो
  • झेंडू - ३० रुपये किलो
  • गुलाब - २०० रुपये शेकडा
  • शेवंती - १०० रुपये किलो 

Web Title: Due to lack of demand for flowers during Sankranthi and Paush month, turnover in flower market decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.