परिचारिकेवर बलात्कार, मिरजेतील डॉक्टरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:28 IST2025-05-27T13:28:29+5:302025-05-27T13:28:59+5:30
मिरज (जि. सांगली ) : दवाखान्यात काम करणाऱ्या परिचारिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी मिरजेतील डॉ. सुयोग ऊर्फ बॉबी अरवट्टगी यास गोव्यात ...

परिचारिकेवर बलात्कार, मिरजेतील डॉक्टरला अटक
मिरज (जि. सांगली) : दवाखान्यात काम करणाऱ्या परिचारिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी मिरजेतील डॉ. सुयोग ऊर्फ बॉबी अरवट्टगी यास गोव्यात पोलिसांनी अटक केली. डॉ. अरवट्टगी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मिरजेतील डॉ. सुयोग ऊर्फ बॉबी अरवट्टगी हे गोव्यात कांकोलीम येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. एक महिन्यापूर्वी डॉ. सुयोग यांनी त्यांच्या खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेस रुग्णाच्या तपासणीच्या बहाण्याने त्यांच्या निवासस्थानी नेले. यावेळी त्यांनी परिचारिकेवर बलात्कार केल्याची तक्रार आहे. या घटनेनंतर पीडित परिचारिकेने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने कांकोलिम पोलिसांत डॉ. अरवट्टगी याच्याविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून डॉ. अरवट्टगी याना अटक केली. तीन दिवस पोलिस कोठडीनंतर न्यायालयाने डॉ. अरवट्टगी यास १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.