Sangli: गणेशमूर्ती आणताना अपघात; मिरजेतील पाच जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 16:04 IST2024-09-06T16:01:36+5:302024-09-06T16:04:04+5:30

मिरज : मिरजेतील धनगर राजा संयुक्त गुरुवार पेठ गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते चंदूर  (इचलकरंजी) येथून मिरजेला मूर्ती आणताना यड्राव फाटा येथे मोटारीने ...

Accident while bringing Ganesha idol; Five people were injured in Miraj | Sangli: गणेशमूर्ती आणताना अपघात; मिरजेतील पाच जण जखमी

संग्रहित छाया

मिरज : मिरजेतील धनगर राजा संयुक्त गुरुवार पेठ गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते चंदूर  (इचलकरंजी) येथून मिरजेला मूर्ती आणताना यड्राव फाटा येथे मोटारीने समोरून ट्रॅक्टरला धडक दिली. यामुळे ट्रॉलीचे तुकडे होऊन अपघातात मंडळाचे अमोल शिंदे, वर्धन हुलवान, गणेश हुलवान, सुशांत पुजारी, सुजित पुजारी सर्व रा. मिरज हे पाच कार्यकर्ते जखमी झाले. यात दोघे गंभीर जखमी आहेत.

मिरजेत खासगी रुग्णालयात या जखमी तरुणांवर उपचार सुरू आहेत. यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, अमित कांबळे, उमेश हारगे, ईश्वर जनवाडे, संदीप कबाडे, आकाश गौराजे, सागर मगदूम या भाजप कार्यकर्त्यांनी दवाखान्यात जाऊन विचारपूस केली. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जखमी कार्यकर्त्यांची व्हिडिओ कॉलवरून विचारपूस करून त्यांना मदतीचे आश्वासन दिले.

Web Title: Accident while bringing Ganesha idol; Five people were injured in Miraj