lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > १ महिनाभर रात्री जेवणच केलं नाही तर? खरंच वजन कमी होते, तब्येत सुधारते की अजून बिघडते

१ महिनाभर रात्री जेवणच केलं नाही तर? खरंच वजन कमी होते, तब्येत सुधारते की अजून बिघडते

What happens if you don't eat dinner for a month? अनेकजण रात्री जेवत नाही, पण सलग ३० दिवस रात्री जेवलं नाही तर काय फायदे तोटे होतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2023 04:28 PM2023-08-28T16:28:20+5:302023-08-28T16:29:25+5:30

What happens if you don't eat dinner for a month? अनेकजण रात्री जेवत नाही, पण सलग ३० दिवस रात्री जेवलं नाही तर काय फायदे तोटे होतात?

What happens if you don't eat dinner for a month? | १ महिनाभर रात्री जेवणच केलं नाही तर? खरंच वजन कमी होते, तब्येत सुधारते की अजून बिघडते

१ महिनाभर रात्री जेवणच केलं नाही तर? खरंच वजन कमी होते, तब्येत सुधारते की अजून बिघडते

दिवसभर काम केल्यानंतर दोन घास सुखाचे खाऊन झोपावे, असे प्रत्येकाला वाटते. घरातील सदस्य डिनरची आवर्जून वाट पाहत असतात. ७ वाजले की, 'आज खाने मै क्या बना है मम्मा' हे वाक्य प्रत्येक चिमुकल्याच्या तोंडात असते. डिनर केल्यानंतर भूक तर भागतेच, शिवाय शरीराला ऊर्जाही मिळते.

परंतु, वेट लॉसच्या नादात अनेक लोकं रात्रीचं जेवण स्किप करतात. परंतु, डिनर स्किप केल्याने खरंच वजन कमी होते का? महिनाभर रात्रीचं जेवण स्किप केल्याने शरीरात काय बदल घडतील? वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग करणं गरजेचं आहे का?(What happens if you don't eat dinner for a month?). 

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?

सध्या सर्वत्र इंटरमिटेंट फास्टिंगचा बोलबाला आहे. इंटरमिटेंट फास्टिंगचा ट्रेण्ड खूपच वाढला आहे. याला फॉलो करणारे लोक साधारण १२ ते १५ तास काहीही खात नाही. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, हे चॅलेंज एक्सेप्ट करून पाहा. ३० दिवस रात्रीचं जेवण स्किप करा. ३० दिवस रात्रीचं जेवण न केल्याने शरीरात कोणते बदल घडतील? याचे फायदे आणि नुकसान किती पाहूयात.

वजन वाढेल, पोट सुटेल म्हणून दही भात खाणं सोडू नका, एक वाटी दही भात खाण्याचे ४ जबरदस्त फायदे पाहा

इंटरमिटेंट फास्टिंग करण्याचे फायदे

१. वजन कमी होण्यास मदत, शरीरातील अतिरिक्त चरबी घटेल.

२. मधुमेहाचा धोका कमी होईल.

३. हृदयाच्या निगडीत समस्या वाढणार नाही.

४. खराब कोलेस्टेरॉल रक्ताच्या नसांमधून नाहीसे होईल.

५. हाय ब्लड प्रेशरची समस्या कमी होईल.

६. शरीरातील मेटाबॉलिज्म बूस्ट होईल.

इंटरमिटेंट फास्टिंग करण्याचे नुकसान

पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांच्या मते, 'इंटरमिटेंट फास्टिंग करण्याचे फायदे अनेक आहेत, पण तेवढेच नुकसान देखील आहेत. प्रत्येक व्यक्तीला याचा फायदा होईलच असे नाही. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच इंटरमिटेंट फास्टिंग करावे.'

१. डिनर स्किप केल्याने भुकेमुळे चिडचिड होऊ शकते.

ब्रेकफास्ट कधी करावा? लंच आणि डिनरमध्ये किती तासाचं अंतर असावं? होमिओपॅथिक डॉक्टर सांगतात..

२. रात्रीचे जेवण वगळल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी खूप खाली जाऊ शकते.

३. डिनर स्किप केल्याने शरीर कमकुवत होऊ शकते. यासह चक्कर देखील येऊ शकते.

४. शरीरात जीवनसत्त्वे, खनिजांसह अनेक पोषक तत्वांची कमतरता भासू शकते.

५. जर आपल्याला गंभीर आजाराची समस्या असेल तर, इंटरमिटेंट फास्टिंग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

Web Title: What happens if you don't eat dinner for a month?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.