lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन वाढेल, पोट सुटेल म्हणून दही भात खाणं सोडू नका, एक वाटी दही भात खाण्याचे ४ जबरदस्त फायदे पाहा

वजन वाढेल, पोट सुटेल म्हणून दही भात खाणं सोडू नका, एक वाटी दही भात खाण्याचे ४ जबरदस्त फायदे पाहा

4 Reasons Why Curd is Best for Weight Loss दही भात खाण्याचे ५ भन्नाट फायदे, वजन होईल कमी - बद्धकोष्ठतेवरही मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2023 12:22 PM2023-08-27T12:22:55+5:302023-08-27T12:35:48+5:30

4 Reasons Why Curd is Best for Weight Loss दही भात खाण्याचे ५ भन्नाट फायदे, वजन होईल कमी - बद्धकोष्ठतेवरही मिळेल आराम

4 Reasons Why Curd is Best for Weight Loss | वजन वाढेल, पोट सुटेल म्हणून दही भात खाणं सोडू नका, एक वाटी दही भात खाण्याचे ४ जबरदस्त फायदे पाहा

वजन वाढेल, पोट सुटेल म्हणून दही भात खाणं सोडू नका, एक वाटी दही भात खाण्याचे ४ जबरदस्त फायदे पाहा

पूर्वीच्या काळी लोकं दही भात आवर्जून खायचे. भात खाल्ल्याने वजन वाढते, पोट सुटतं, मधुमेहीग्रस्त रुग्णांनी भात खाऊ नये, असे भाताबाबतीत अनेक गैरसमज आहेत. मात्र, साऊथ इंडियन आहारात आजही कर्ड राइसचा समावेश आहे.  आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहारात भाताचा समावेश असायलाच हवा. दही भात हे आपल्या गट हेल्थसाठी आरोग्यदायी मानले जाते. दही भात हे एक कम्फर्ट फूड आहे. जे आपल्या पचनसंस्थेसाठी उत्तम मानले जाते.

आहारतज्ज्ञ आणि डाएट कॅसलचे संस्थापक अमी तुराखिया म्हणतात, ''ज्यांना अपचनाचा त्रास आहे, त्यांनी आपल्या आहारात दही - भाताचा समवेश करावा. दही हा प्रोबायोटिक्सचा उत्तम स्रोत आहे. दही - भात खाल्ल्याने स्वस्थ मायक्रोबियल संतुलन राखण्यास मदत होते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते''(4 Reasons Why Curd is Best for Weight Loss).

दही - भात खाण्याचे फायदे

पचनसंस्थेसाठी फायदेशीर

दही - भात पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. दही - भात पचण्यास सोपे आहे. ज्यामुळे अॅसिडीटी, पोट फुगणे या त्रासापासून आराम मिळतो. दही भात प्रोबायोटिक्सने समृद्ध आहे, जे निरोगी आतड्यांतील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देतात. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटदुखीपासून आराम मिळतो.

ग्लासमधली अळूवडी? फक्त १० मिनिटांत होणारी ही आंबट गोड अळूवडी झटपट करा सहज घरी

स्ट्रेस बस्टर

एनसीबीआयनुसार, दही भात खाल्याने तणाव कमी होतो. त्यात असलेल्या प्रोबायोटिक बॅक्टेरीया, अॅंटी ऑक्सीडेंट आणि गुड फॅट्स, यामुळे मुड सुधारण्यास मदत होते.

वेट लॉससाठी करते मदत

एक वाटी दही - भात खाल्ल्याने पोट लगेच भरते. ज्यामुळे आपण उलट - सुलट खाणे टाळतो. दही - भात हे लवकर पचते. त्यात कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहते.

ब्रेकफास्ट कधी करावा? लंच आणि डिनरमध्ये किती तासाचं अंतर असावं? होमिओपॅथिक डॉक्टर सांगतात..

प्रतिकारशक्ती वाढते

दह्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करतात. तसेच आजारी असताना शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. यामध्ये चांगले बॅक्टेरिया देखील असतात, जे शरीर निरोगी ठेवतात.

दही भात करण्याची योग्य पद्धत

शिजवलेल्या भातात दोन किंवा तीन चमचे दही मिसळा. त्यात चवीनुसार मीठ घाला. फोडणीच्या पळीत देशी तूप घालून गरम करा, नंतर त्यात कडीपत्ता, मोहरी आणि लाल मिरची घालून फोडणी भातावर पसरवा. अश्या प्रकारे दही भात खाण्यासाठी रेडी.

Web Title: 4 Reasons Why Curd is Best for Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.