पाठदुखी- कंबरदुखी- अशक्तपणाचा त्रासच विसरा, खा ५ प्रकारच्या बिया रोज- चेहऱ्यावरही येईल तेज

Published:May 18, 2024 08:23 AM2024-05-18T08:23:15+5:302024-05-18T15:21:10+5:30

पाठदुखी- कंबरदुखी- अशक्तपणाचा त्रासच विसरा, खा ५ प्रकारच्या बिया रोज- चेहऱ्यावरही येईल तेज

बऱ्याचदा असं होतं की आपण जे काही खातो त्यातून आपल्याला पुरेसं पोषण मिळत नाही. त्यामुळे मग शरीरात कोणत्या ना कोणत्या घटकाची कमतरता निर्माण होते आणि पाठदुखी, कंबरदुखी, अशक्तपणा, गळून गेल्यासारखं होणे अशा वेगवेगळ्या तक्रारी सुरू होतात.

यापैकी सगळ्यात पहिलं आहे चिया सीड्स. यातून फायबर, प्रोटीन, ओमेगा ३ फॅटी ॲसिड, मॅंगनीज, कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही ते उपयुक्त ठरतं.

पाठदुखी- कंबरदुखी- अशक्तपणाचा त्रासच विसरा, खा ५ प्रकारच्या बिया रोज- चेहऱ्यावरही येईल तेज

जवसातूनही ओमेगा ३ फॅटी ॲसिड, प्रोटीन्स, फायबर भरपूर प्रमाणात मिळतात. तसेच हृदय आणि कोलेस्ट्रॉलच्या बाबतीतही ते उत्तम आहे. त्यातून भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात अशी माहिती आहारतज्ञ दिपिका जयस्वाल यांनी healthshots.com वर दिली.

पाठदुखी- कंबरदुखी- अशक्तपणाचा त्रासच विसरा, खा ५ प्रकारच्या बिया रोज- चेहऱ्यावरही येईल तेज

तिसरा पदार्थ आहे सुर्यफुलाच्या बिया. त्यातून व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, सेलेनियम यासोबतच ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतात. केसांच्या आरोग्यासाठीही या बिया अतिशय उत्तम मानल्या जातात. तब्येत सुधारण्यासाठी हा एक चांगला पर्याय असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात.

पाठदुखी- कंबरदुखी- अशक्तपणाचा त्रासच विसरा, खा ५ प्रकारच्या बिया रोज- चेहऱ्यावरही येईल तेज

भोपळ्याच्या बियांमधून मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, लोह चांगल्या प्रमाणात मिळते. BMC Medicine यांच्या रिपोर्टनुसार हृदयविकार टाळण्यासाठी, हाडांच्या मजबुतीसाठी तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठीही मॅग्नेशियम अतिशय उपयुक्त ठरते.

पाठदुखी- कंबरदुखी- अशक्तपणाचा त्रासच विसरा, खा ५ प्रकारच्या बिया रोज- चेहऱ्यावरही येईल तेज

तिळामधून झिंक, कॉपर, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स, फायबर चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे हे सुपरफूड आहारात असायलाच हवं.