lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ब्रेकफास्ट कधी करावा? लंच आणि डिनरमध्ये किती तासाचं अंतर असावं? होमिओपॅथिक डॉक्टर सांगतात..

ब्रेकफास्ट कधी करावा? लंच आणि डिनरमध्ये किती तासाचं अंतर असावं? होमिओपॅथिक डॉक्टर सांगतात..

The ideal time to consume breakfast, lunch and dinner to lose weight उत्तम आरोग्यासाठी जेवणाच्या या वेळा पाळाच. आरोग्य सुधारेल - गंभीर आजार छळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2023 12:08 PM2023-08-27T12:08:03+5:302023-08-27T12:11:56+5:30

The ideal time to consume breakfast, lunch and dinner to lose weight उत्तम आरोग्यासाठी जेवणाच्या या वेळा पाळाच. आरोग्य सुधारेल - गंभीर आजार छळणार नाही

The ideal time to consume breakfast, lunch and dinner to lose weight | ब्रेकफास्ट कधी करावा? लंच आणि डिनरमध्ये किती तासाचं अंतर असावं? होमिओपॅथिक डॉक्टर सांगतात..

ब्रेकफास्ट कधी करावा? लंच आणि डिनरमध्ये किती तासाचं अंतर असावं? होमिओपॅथिक डॉक्टर सांगतात..

बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे प्रत्येकाचं आरोग्याच्याबाबतीत गणित बिघडत चाललं आहे. उशिरा उठणं, वेळेवर ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर न करणं. रात्रीचं उशिरा डिनर केल्यानंतर लगेच झोपणं. या सगळ्या कारणांमुळे आरोग्य बिघडत चाललं आहे. कमी वयात शरीरात गंभीर आजार उद्भवतात. व हे आजार जन्मभर आपला पाठलाग सोडत नाही.

मात्र, आपल्या इटिंग हॅबिट्समध्ये काही बदलाव करून, आपण आपले आरोग्य सुधारू शकतो. यासंदर्भात, होमिओपॅथिक डॉक्टर वंदना गुलाटी यांनी ३ टिप्स इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केल्या आहेत. नियमित हे इटिंग हॅबिट्स फॉलो केल्यामुळे लठ्ठपण, मधुमेह, पोटाच्या निगडीत आजार छळणार नाही(The ideal time to consume breakfast, lunch and dinner to lose weight).

होमिओपॅथिक डॉक्टर सांगतात ३ महत्वाच्या टिप्स

ब्रेकफास्ट कधी करायला हवे?

डॉ. वंदना गुलाटी यांच्या मते, 'ब्रेकफास्ट करण्यासाठी सकाळची ७ ते ८ ची वेळ उत्तम मानली जाते. सकाळी १० नंतर नाश्ता करू नये. उठल्यानंतर ३० मिनिटांच्या आत, काहीतरी खाणे आवश्यक आहे. व आपल्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करणे गरजेचं आहे.

‘ही’ ५ फळं खाल्ल्यावर चुकूनही पाणी पिऊ नका, पोटाला होईल गंभीर त्रास

लंच कधी करायला हवे?

दुपारचे जेवण दुपारी १२:३० ते २ च्या दरम्यान करायला हवे. दुपारी ४ नंतर लंच करू नये. ४ नंतर लंच केल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो. यासह शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. नाश्ता आणि रात्रीचे जेवण यामध्ये ४ तासांचे अंतर असावे. लंचमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असायला हवा.

प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी सतत प्यायल्याने खरंच वजन वाढतं का? तज्ज्ञ सांगतात, प्लास्टिक बाटली वापरली तर..

डिनर टाईम काय असावा?

रात्रीचे जेवण सायंकाळी ६ ते ८ च्या दरम्यान करायला हवे. रात्रीचे जेवण रात्री ९ नंतर करू नये. नेहमी झोपण्याच्या ३ तास आधी जेवण करावे. कारण रात्रीच्या वेळी शरीराची हालचाल होत नाही. ज्यामुळे अन्न लवकर पचत नाही. व लठ्ठपणाचाही धोका वाढतो.

Web Title: The ideal time to consume breakfast, lunch and dinner to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.