दिवसभरात कधी ना कधी 'काहीतरी गोड खावंसं वाटतं' हा अनुभव अनेकांना येतो. विशेषतः ताण, थकवा किंवा कंटाळा आला की गोड पदार्थांची आठवण जास्त होते. (Weight Loss Tips : you won't feel like eating sweet ever again , see what to do )ही सवय जर वाढली, तर वजन वाढणे, ऊर्जा कमी होणे आणि पुढे Type 2 Diabetes सारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच स्वीट क्रेविंग्जवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. शरीराला ऊर्जा हवी असेल तर गोड खावंस वाटतं. कारण साखर झटपट ऊर्जा वाढवते.
सतत गोड खायची इच्छा होण्यामागे काही कारणं असतात. शरीरात ऊर्जा कमी झाल्यावर, रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढवण्यासाठी मेंदू गोड पदार्थांची मागणी करतो. झोप कमी असणे, ताण जास्त असणे किंवा वेळेवर न खाणे ही मोठी कारणं आहेत. काही वेळा केवळ ही, सवयीमुळे किंवा भावनिक कारणांमुळे (emotional eating) तयार होते. ही इच्छा कमी करण्यासाठी काही सोपे उपाय उपयोगी पडतात. सर्वात आधी, नियमित आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. जेवणात प्रथिने (protein), फायबर आणि चांगले फॅट्स असतील, तर पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि गोड खाण्याची इच्छा कमी होते. उदाहरणार्थ, डाळी, कडधान्य, सुकामेवा आणि भाज्या यांचा आहारात समावेश करा.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे पाणी पुरेसं पिणं. अनेक वेळा तहान लागली असताना देखील आपल्याला भूक किंवा गोड खायची इच्छा होते. त्यामुळे दिवसातून भरपूर पाणी पिणं हा सोपा पण प्रभावी उपाय आहे. झोप पूर्ण घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. कमी झोपेमुळे शरीरातील हार्मोन्स बिघडतात आणि गोड खाण्याची इच्छा वाढते. त्यामुळे रोज किमान ७–८ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.
गोड खायची इच्छा झालीच, तर लगेच चॉकलेट किंवा मिठाई खाण्यापेक्षा हेल्दी पर्याय निवडा जसं की फळं, खजूर, थोडा गूळ किंवा डार्क चॉकलेट. यामुळे गोडाची इच्छा पूर्ण होते आणि शरीरालाही पोषण मिळतं. ताण कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा चालणं (walk) यासारख्या गोष्टींचा आधार घ्या. कारण ताण हा स्वीट क्रेविंग्जचा मोठा कारण असतो. मन शांत असेल, तर अनावश्यक खाणंही कमी होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, गोड पूर्णपणे बंद करण्याऐवजी मर्यादित खाणं शिका. कधी कधी आवडीचा गोड पदार्थ खाल्ला, तरी चालते. पण त्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे.
