Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रोज रात्री झोपण्यापूर्वी ‘हा’ चहा प्या, सुटलेलं पोट-वाढलेलं वजन झरझर होईल कमी

रोज रात्री झोपण्यापूर्वी ‘हा’ चहा प्या, सुटलेलं पोट-वाढलेलं वजन झरझर होईल कमी

Perfect Bed Time Tea For Fast Weight Loss: वाढलेलं वजन, सुटलेलं पोट लवकरात लवकर कमी करायचं असेल तर आहारतज्ज्ञांनी सांगितलेला हा उपाय करून बघाच..(how to get rid of belly fat?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2025 18:31 IST2025-05-29T16:09:08+5:302025-05-30T18:31:39+5:30

Perfect Bed Time Tea For Fast Weight Loss: वाढलेलं वजन, सुटलेलं पोट लवकरात लवकर कमी करायचं असेल तर आहारतज्ज्ञांनी सांगितलेला हा उपाय करून बघाच..(how to get rid of belly fat?)

perfect bed time tea for fast weight loss, weight loss tips, how to get rid of belly fat | रोज रात्री झोपण्यापूर्वी ‘हा’ चहा प्या, सुटलेलं पोट-वाढलेलं वजन झरझर होईल कमी

रोज रात्री झोपण्यापूर्वी ‘हा’ चहा प्या, सुटलेलं पोट-वाढलेलं वजन झरझर होईल कमी

Highlights हा चहा जर नियमितपणे प्यायला तर नक्कीच वजन कमी होऊ शकते, असं तज्ज्ञ सांगतात. 

वाढलेलं वजन कमी कसं करावं, हा प्रश्न सध्या अनेकांना छळतो आहे. काही जण नियमितपणे व्यायाम करतात, डाएटिंग करतात, पण तरीही सुटलेलं पोट आणि वाढत चाललेलं वजन काही कमी होत नाही. याचं कारण एकच की डाएट किंवा व्यायाम तर अनेकजण करतात. पण दिवसभरात काही ना काही चूक होते, काहीतरी कमी जास्त खाल्लं जातं किंवा आपली दिनचर्या चुकीची असते त्यामुळे मग वजन वाढत जातं. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर आता वाढतं वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला हा एक सोपा उपाय करून पाहा (how to get rid of belly fat?). यामध्ये त्यांनी एक खास चहा प्यायला सांगितला असून वेटलॉससाठी त्याचा निश्चितच उपयोग होतो.(perfect bed time tea for fast weight loss)

 

वाढतं वजन आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी उपाय 

वजन कमी करण्यासाठी काही दिवस नियमितपणे रात्री झाेपण्यापुर्वी एक खास प्रकारचा चहा करून प्या, असा सल्ला आहारतज्ज्ञ ख्याती रुपानी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा चहा किंवा काढा करण्यासाठी आपल्याला ओवा, बडिशेप, हळद, धने पावडर हे पदार्थ लागणार आहेत. 

पावसाळ्यात लाकडी फर्निचरला बुरशी, वाळवी लागण्याची भीती? ४ टिप्स- फर्निचर टिकेल वर्षांनुवर्षे.. 

हा काढा करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये एक चमचा बडिशेप, एक चमचा धने, १ टीस्पून हळद आणि १ टीस्पून ओवा घाला. हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी येऊन ते जवळपास पाऊण ग्लास एवढं झाल्यानंतर गॅस बंद करा. हे पाणी गरम गरमच प्या. 

 

बडिशेप, ओवा या पदार्थांमुळे पचनक्रिया चांगली होते तसेच शरीरावरील सूज कमी होण्यास मदत होते. हळदीमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स आणि ॲण्टी इंन्फ्लामेटरी गुणधर्म असतात.

महिलांनो सावधान! मासिक पाळीबाबत 'या' खोट्या माहितीवर विश्वास ठेवाल तर पस्तावाल.. 

त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हळदही उपयुक्त ठरते. धन्यांमुळे पचन क्रिया चांगली होऊन रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे हा चहा जर नियमितपणे प्यायला तर नक्कीच वजन कमी होऊ शकते, असं तज्ज्ञ सांगतात. 

 

Web Title: perfect bed time tea for fast weight loss, weight loss tips, how to get rid of belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.