ग्लॅमरसच्या जगात स्वत:ला फिट आणि प्रेझेंटेबल ठेवणं सगळ्यात मोठं आव्हान आहे. हेच आव्हान बिग बॉस फेम अशनूर कौरने स्वीकारले आणि फक्त ६ महिन्यात आपल्या फॅट टू फिट ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना थक्क केले. बिग बॉसमध्येही तिच्या वजनावरुन तिला अनेकांनी विचारले होते.(Ashnoor Kaur weight loss journey) तर काही काळापूर्वी अशनूरच्या वाढलेल्या वजनामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता, मात्र खचून न जाताना तिने या टिकलेला आपल्या फिटनेसने उत्तर दिलं. अशनूरचा हा प्रवास फक्त वजन कमी करण्याचा नव्हता तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम बनवणे हे देखील महत्त्वाचे होते. (Ashnoor Kaur fat to fit transformation)
बिग बॉसमध्ये तिच्या वजनावरुन ट्रोल केल्यानंतर तिने सांगितलं होतं की वयाच्या १४ व्या वर्षापासून तिला हार्मोनल असंतुलन, तणाव आणि खाण्याचे विकार यांसारख्या कठीण अनुभवांना सामोरे जावे लागले आहे, ज्याचा तिच्या वजनावर आणि शरीरावर परिणाम झाला आहे.(Ashnoor Kaur liquid diet routine) आपण सतत तणावाखाली असल्यास शरीरातील कॉर्टिसोल तणाव संप्रेरकाची पातळी वाढते, ज्यामुळे चरबी वाढणे, चयापचय मंदावणे आणि भूक लागण्याच्या समस्या वाढतात. तिने वजन कमी करण्यासाठी कोणत्याही शॉर्टकटचा वापर न करता कडक डाएट आणि वर्कआउट प्लान फॉलो केला. तिने लिक्विड डाएट आणि रिकाम्या पोटी व्यायाम या दोन्ही गोष्टींवर भर दिला. तिने आपलं वजन कमी कसं केलं याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
1. टेली चक्करला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की आपल्या आहारात लिक्विड पदार्थांना जास्त महत्त्व दिले. यात ताजी फळे, भाज्यांचा ज्यूस, नारळ पाणी, सूप आणि डिटॉक्स वॉटरचा समावेश केला. लिक्विड डाएटमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि पचन सुधारते.
2. सकाळी काहीही न खाता नियमितपणे व्यायाम करणं. तज्ज्ञांच्या मते रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने शरीर ऊर्जेसाठी साठवलेली चरबी जाळण्यास मदत करते. ती नित्य नियमाने कार्डिओ, योगासने आणि हाय- इंटेंसिटी वर्कआट केलं.
3. तिने साखर, मैद्याचे पदार्थ आणि कोणतेही पॅकेज्ड फूड खाल्ले नाही. आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवून कर्बोदके कमी केली. रात्रीचे जेवणही लवकर करण्यास सुरुवात केली. रोज न चुकता डाएट आणि व्यायाम फॉलो केल्यास वजन नक्की कमी होण्यास मदत होते.
4. वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत योग्य आहार आणि स्ट्रेस देखील कमी करायला हवा. त्यासाठी योगासने आणि मेडिटेशन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
