Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > जुनं लाकडी पोळपाट - लाटणं नव्यासारखं चमकेल! 'या' थेंबभर तेलाने होईल मिनिटांत स्वच्छ - वर्षानुवर्षे टिकेल चांगलं...

जुनं लाकडी पोळपाट - लाटणं नव्यासारखं चमकेल! 'या' थेंबभर तेलाने होईल मिनिटांत स्वच्छ - वर्षानुवर्षे टिकेल चांगलं...

wooden chakla belan cleaning tips : how to clean wooden rolling board : how to clean wooden chakla belan at home : रोजच्या वापरातलं काळं पडलेलं लाकडी पोळपाट-लाटणं होईल नव्यासारखं स्वच्छ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2026 16:05 IST2026-05-12T16:00:15+5:302026-05-12T16:05:01+5:30

wooden chakla belan cleaning tips : how to clean wooden rolling board : how to clean wooden chakla belan at home : रोजच्या वापरातलं काळं पडलेलं लाकडी पोळपाट-लाटणं होईल नव्यासारखं स्वच्छ...

wooden chakla belan cleaning tips how to clean wooden rolling board how to clean wooden chakla belan at home | जुनं लाकडी पोळपाट - लाटणं नव्यासारखं चमकेल! 'या' थेंबभर तेलाने होईल मिनिटांत स्वच्छ - वर्षानुवर्षे टिकेल चांगलं...

जुनं लाकडी पोळपाट - लाटणं नव्यासारखं चमकेल! 'या' थेंबभर तेलाने होईल मिनिटांत स्वच्छ - वर्षानुवर्षे टिकेल चांगलं...

आपल्या स्वयंपाकघरात कितीही नवीकोरी वेगवेगळ्या प्रकारची भांडी आली, तरी 'लाकडी पोळपाट आणि लाटण्याशिवाय' आपलं किचन अपूर्णच आहे. गरमागरम पोळ्या असोत किंवा खुसखुशीत पुऱ्या, लाकडी पोळपाटावर लाटलेल्या पोळी आणि पुरीची चव काही वेगळीच असते! पण आपण कधी विचार केलाय का की, दररोज वापरलं जाणारं हे पोळपाट-लाटणं खरोखर स्वच्छ होतंय का? स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये पोळपाट आणि लाटण यांचा सर्वात जास्त वापर होतो. विशेषतः लाकडी पोळपाट-लाटण वापरताना त्यावर पीठ, तेल आणि ओलावा साचत जातो. वेळेवर योग्य स्वच्छता न केल्यास त्यामध्ये जंतू, बुरशी किंवा दुर्गंधी निर्माण होऊ शकते. अनेकदा आपण हे फक्त पाण्याने धुवून ठेवतो पण त्यामुळे लाकूड खराब होण्याची शक्यता असते(wooden chakla belan cleaning tips).

अनेकदा साध्या पाण्याने धुतल्यावरही पोळपाटावर पिठाचे कण अडकून राहतात, ज्यामुळे त्याला कुबट वास येऊ लागतो किंवा त्यावर बुरशी धरण्याची भीती असते. पोळपाट काळपट पडलं असेल किंवा (how to clean wooden rolling board) त्याला चिकटपणा आला असेल, तर साध्या साबणाने ते घासून उपयोग नाही. मग घरच्याघरीच, एकही रुपया खर्च न करता लाकडी पोळपाट-लाटणं नव्यासारखं चकचकीत कसं करायचं? आणि ते वर्षानुवर्षे कसं टिकवायचं? याच्या (how to clean wooden chakla belan at home) काही खास आणि सोप्या 'किचन ट्रिक्स' पाहूयात. 

घरच्याघरीच लाकडी पोळपाट - लाटणं स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक... 

पोळपाट आणि लाटणं स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी एका कोरड्या कपड्याने ते पुसून घ्या, जेणेकरून त्यावर साचलेले सुके पीठ निघून जाईल. यानंतर पोळपाट-लाटण्यावर थोडे मीठ शिंपडा. आता एक लिंबू मधून कापून घ्या आणि मिठावर ठेवून हलक्या हाताने रगडा. लिंबू आणि मिठाचे हे मिश्रण लाकडावर साचलेला चिकटपणा, डाग आणि कुबट वास घालवण्यासाठी मदत करेल.

प्रेशर कुकरची शिट्टी झाली काळीकुट्ट मेणचट ? ५ उपाय - १ रुपयाही खर्च न करता शिट्टी चमकवा नव्यासारखी...

घरभर प्रत्येक कोपऱ्यात काळ्या मुंग्यांची रांग? चटकन स्वयंपाकघरातील ५ पदार्थ ‘असे’ वापरा, मुंग्या गायब...

काही मिनिटे घासल्यानंतर कोमट पाण्याने पोळपाट-लाटणे व्यवस्थित स्वच्छ करा. लाकडी पोळपाट-लाटणे जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवू नका. यामुळे लाकूड लवकर खराब होऊ शकते आणि त्याला तडे जाऊ शकतात. स्वच्छता केल्यानंतर पोळपाट-लाटणे कोरड्या आणि स्वच्छ कपड्याच्या मदतीने नीट पुसून घ्यावे. जर लाकडामध्ये ओलावा राहिला, तर त्यावर बुरशी लागण्याची किंवा कुबट वास येण्याची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच, ते पुसल्यानंतर काही वेळ हवेत सुकायला ठेवावे.

चमक वाढवण्यासाठी घरगुती उपाय... 

जेव्हा पोळपाट-लाटणे पूर्णपणे सुकेल, तेव्हा त्यावर थोडे मोहरीचे किंवा नारळाचे तेल लावा आणि मऊ कपड्याने पुसून घ्या. यामुळे लाकडाची चमक कायम राहते आणि पोळपाट-लाटणे लवकर खराब होत नाही.

जपानी लोकांच्या ५ सवयी वाढवतात आयुष्य-हार्ट ॲटॅकही टळतो, ठरवलं तर आपल्यालाही जमेल सहज...

या गोष्टींची काळजी घ्या... 

लाकडी पोळपाट-लाटणे कधीही रासायनिक (Chemical) क्लिनरने स्वच्छ करू नये. पाण्याने धुतल्यानंतर ते नेहमी कपड्याने पुसून कोरडे करा, कारण दीर्घकाळ ओले राहिल्यास ते लवकर खराब होऊ शकते. योग्य देखभाल आणि नियमित स्वच्छतेमुळे तुमचे पोळपाट-लाटणे वर्षानुवर्षे नव्यासारखे आणि स्वच्छ राहू शकते.

Web Title : लकड़ी के चकला बेलन को तेल से सालों तक चमकाएं!

Web Summary : नींबू और नमक से लकड़ी के चकला बेलन को आसानी से साफ करें। सूखा पोंछे, चमक और दीर्घायु के लिए तेल लगाएं। रसायन से बचें, सूखापन सुनिश्चित करें।

Web Title : Clean wooden chakla belan with this oil for years!

Web Summary : Clean wooden chakla belan easily with lemon and salt. Wipe dry, apply oil for shine and longevity. Avoid chemicals, ensure dryness.