घराच्या कोपऱ्यात, स्वयंपाकघरात किंवा खिडक्यांच्या आसपास अचानक काळ्या मुंग्यांचा सुळसुळाट सुरू झाला की खूप त्रास होतो. विशेषतः गोड पदार्थ, साखर किंवा अन्नपदार्थांच्या आसपास या मुंग्या मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. अनेकदा कितीही साफसफाई केली तरी पुन्हा पुन्हा मुंग्या घरात येताना दिसतात, त्यामुळे घर अस्वच्छ वाटू लागते. एकदा का मुंग्यांनी घरात शिरकाव केला की, त्यांना घालवणं फारच कठीण होत. काळ्या मुंग्या केवळ त्रासदायकच नसतात, तर त्या अन्नपदार्थांवरही फिरत असल्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीनेही काळजी घेणं गरजेचं असतं. घराच्या कोपऱ्यात, भिंतीवर किंवा साखरेच्या डब्याभोवती अशा काही घरातील मोजक्याच ठिकाणी काळ्या मुंग्यांचा सुळसुळाट असतो(home remedies for black ants).
अनेकजण मुंग्या घालवण्यासाठी केमिकलयुक्त स्प्रे किंवा औषधांचा वापर करतात, पण त्यामुळे घरातील वयोवृद्ध, लहान मुलांना याचा त्रास होऊ शकतो. काळ्या मुंग्यांना घरातून पळवून लावण्यासाठी काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतात. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांच्या मदतीने काळ्या मुंग्यांना दूर ठेवणं शक्य आहे. जर तुम्हालाही या मुंग्यांच्या त्रासापासून सुटका हवी असेल, तर काही सोपे आणि घरगुती उपाय (how to remove black ants from house without chemicals) नक्कीच फायदेशीर ठरतील. काळ्या मुंग्यांना घरातून (simple home tips to keep black ants away naturally) घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील ते पाहूयात.
घरातील काळ्या मुंग्यांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी खास घरगुती उपाय...
१. एका भांड्यात समप्रमाणात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर आणि पाणी घ्या. हे मिश्रण नीट मिक्स करा आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. हा स्प्रे तुमच्या किचन प्लॅटफॉर्मवर, काळ्या मुंग्यांच्या रांगेवर आणि घराच्या अशा प्रत्येक कोपऱ्यात फवारा जिथून मुंग्या येतात. लिंबू आणि व्हिनेगरचा तीव्र वास मुंग्यांना अजिबात आवडत नाही, ज्यामुळे त्या उग्र वासाने घरातील काळ्या मुंग्या दूर पळतात.
२. जर तुम्ही मोठ्या काळ्या मुंग्यांमुळे हैराण असाल आणि त्या वारंवार परत येत असतील, तर त्यांना पळवून लावण्यासाठी हळद आणि मिठाचा वापर करा. ज्या ठिकाणाहून मुंग्या येतात, तिथे थोडी हळद आणि मीठ शिंपडा. हे दोन्ही पदार्थ एक नैसर्गिक रिपेलेंट म्हणून अत्यंत फायदेशीर ठरतात.
जपानी लोकांच्या ५ सवयी वाढवतात आयुष्य-हार्ट ॲटॅकही टळतो, ठरवलं तर आपल्यालाही जमेल सहज...
३. दालचिनी वाटून त्याची पावडर तयार करा. जर दालचिनी नसेल तर तुम्ही लवंग देखील घेऊ शकता. ही पावडर मुंग्या येण्याच्या वाटेवर ठेवा. जिथे तुम्हाला मुंग्यांचे वारूळ किंवा छिद्र दिसेल तिथेही ही पावडर टाका. यामुळे मुंग्या पुन्हा दिसणार नाहीत. दालचिनीचा वास खूप तीव्र असतो. हा वास मुंग्यांना आवडत नाही, त्यामुळे त्या दूर राहणे पसंत करतात.
४. पुदिन्याचे तेल एक कप पाण्यात अर्धा चमचा तेल मिसळून स्प्रे बाटलीत भरा. आता मोठ्या काळ्या मुंग्यांवर याचा स्प्रे करा. मुंग्यांना पुदिन्याचा वास देखील खूप तीव्र वाटतो आणि तो त्यांना आवडत नाही.
केस गळून टक्कल पडण्यापूर्वी करा 'हा' उपाय! केळीची साल केसांवर 'अशी' लावा चटकन...
५. कापराचा वास मुंग्यांना अजिबात सहन होत नाही. ज्या ठिकाणी मुंग्यांचा सुळसुळाट जास्त आहे, तिथे कापराच्या वड्या ठेवा किंवा कापराची पावडर शिंपडा.
६. लसणाच्या दोन-तीन पाकळ्या सोलून मुंग्या येण्याच्या ठिकाणी ठेवा. लसणाच्या उग्र वासामुळे मुंग्या घरातून पळ काढतात.
७. एका स्प्रे बाटलीत कोमट पाणी घेऊन त्यात थोडे मीठ घालून ते विरघळवून घ्या. हे मिठाचे पाणी मुंग्यांच्या वाटेवर फवारल्यास त्या दूर पळतात.
८. कडुनिंबामध्ये नैसर्गिक कीटकनाशक गुणधर्म असतात. कडुनिंबाची वाळलेली पाने मुंग्या येतात तिथे ठेवा किंवा कडुनिंबाच्या तेलाचा स्प्रे केल्याने मुंग्यांचा बंदोबस्त होतो.
९. जर मुंग्यांचा त्रास खूपच जास्त असेल, तर थोडे बोरिक ॲसिड साखरेच्या पाण्यात मिसळून मुंग्यांच्या छिद्रापाशी ठेवा. साखरेच्या गोड वासाने मुंग्या तिथे येतात आणि बोरिक ॲसिडच्या वासाने त्या पुन्हा त्याच जागी फिरकतही नाहीत.
