Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > प्रेशर कुकरची शिट्टी झाली काळीकुट्ट मेणचट ? ५ उपाय - १ रुपयाही खर्च न करता शिट्टी चमकवा नव्यासारखी...

प्रेशर कुकरची शिट्टी झाली काळीकुट्ट मेणचट ? ५ उपाय - १ रुपयाही खर्च न करता शिट्टी चमकवा नव्यासारखी...

how to clean cooker whistle : easy ways to clean cooker whistle : प्रेशर कुकरची काळी पडलेली शिट्टी होईल चकाचक, पाहा ५ घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2026 12:05 IST2026-05-10T12:00:10+5:302026-05-10T12:05:02+5:30

how to clean cooker whistle : easy ways to clean cooker whistle : प्रेशर कुकरची काळी पडलेली शिट्टी होईल चकाचक, पाहा ५ घरगुती उपाय...

how to clean cooker whistle easy ways to clean cooker whistle how to clean pressure cooker whistle naturally | प्रेशर कुकरची शिट्टी झाली काळीकुट्ट मेणचट ? ५ उपाय - १ रुपयाही खर्च न करता शिट्टी चमकवा नव्यासारखी...

प्रेशर कुकरची शिट्टी झाली काळीकुट्ट मेणचट ? ५ उपाय - १ रुपयाही खर्च न करता शिट्टी चमकवा नव्यासारखी...

स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या भांड्यांपैकीच एक म्हणजे प्रेशर कुकर...स्वयंपाकघरात प्रेशर कुकर दररोज वापरल्याने कुकरची शिट्टी हळूहळू काळी पडू लागते किंवा तिच्यामध्ये तेल, मसाले आणि घाणीचा थर जमा होतो. अनेकदा शिट्टी व्यवस्थित स्वच्छ न केल्यास तिच्या छिद्रांमध्ये अडथळा (how to clean cooker whistle) निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे कुकरचा प्रेशर योग्य पद्धतीने बाहेर पडत नाही. त्यामुळे केवळ स्वच्छतेसाठीच नाही, तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही कुकरची शिट्टी वेळोवेळी स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं ठरतं(easy ways to clean cooker whistle).

अनेकदा आपण कुकर स्वच्छ करताना त्याच्या शिट्टीकडे दुर्लक्ष करतो. कुकरची शिट्टी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, कारण त्यातूनच वाफ बाहेर पडते. जर ही शिट्टी अन्नाचे कण साचल्यामुळे अडकली, तर कुकरचा स्फोट होण्यासारख्या गंभीर दुर्घटना घडू शकतात. शिवाय, अस्वच्छ शिट्टीमुळे अन्नाचा वास येणे किंवा कुकरमधून पाणी बाहेर येणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे, कुकरच्या शिट्टीची नियमित आणि योग्य पद्धतीने साफसफाई करणे आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे, कुकरची शिट्टी स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लिनरची गरज नसते. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही साध्या पदार्थांच्या मदतीने तुम्ही शिट्टी अगदी नवीनसारखी चमकदार करू शकता. कुकरची शिट्टी स्वच्छ करण्याचे (how to clean pressure cooker whistle naturally) काही सोपे आणि घरगुती उपाय पाहूयात. 

कुकरची शिट्टी स्वच्छ करण्याच्या सोप्या ट्रिक्स...

१. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा :- कुकरच्या शिट्टीमध्ये साचलेली अन्नाची चिकट घाण काढण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. एका वाटीत कोमट पाणी घेऊन त्यात २ चमचे व्हिनेगर आणि १ चमचा बेकिंग सोडा मिसळा. या मिश्रणात कुकरची शिट्टी १५-२० मिनिटे भिजत ठेवा. यामुळे त्यातील कडक झालेली घाण मऊ होईल आणि ब्रशच्या साहाय्याने सहज निघून येईल.

२. लिंबाचा रस आणि मीठ :- शिट्टीवर क्षारांचे पांढरे डाग पडले असतील, तर लिंबाचा रस आणि मीठ वापरा. लिंबाच्या रसात थोडे मीठ मिसळून ते शिट्टीला चोळा. १० मिनिटांनंतर जुन्या टूथब्रशने शिट्टी घासून काढा. लिंबामधील आम्ल गुणामुळे शिट्टी नव्यासारखी चमकू लागेल.

भर उन्हाळ्यात उंदरांचा सुळसुळाट म्हणजे डोक्याला ताप, ग्लासभर पाण्याचा ‘हा’ जादुई स्प्रे उंदरांचा करेल नायनाट...

३. टूथपिक किंवा पिनने छिद्र स्वच्छ करा :- शिट्टीच्या छोट्या छिद्रांमध्ये अनेकदा अन्नकण अडकतात. अशावेळी टूथपिक, पिन किंवा छोट्या ब्रशच्या मदतीने छिद्र काळजीपूर्वक स्वच्छ करा. हळूवारपणे छिद्रांमधील कचरा बाहेर काढा, जेणेकरून वाफ जाण्याचा मार्ग मोकळा होईल.

दात पांढरेशुभ्र आणि हिरड्या मजबूत करणारं दंतमंजन, खिशाला परवडणारा घरगुती सुरक्षित उपाय...

४. व्हिनेगरचा उपाय :- व्हिनेगरमध्ये नैसर्गिक क्लिनिंग गुणधर्म असतात. एका भांड्यात पाणी आणि व्हिनेगर समान प्रमाणात घेऊन शिट्टी काही वेळ त्यात ठेवा. त्यानंतर ब्रशने स्वच्छ केल्यास शिट्टी चमकदार दिसू लागते.

५. डिशवॉश लिक्विड आणि गरम पाणी :- दररोजच्या साफसफाईसाठी गरम पाण्यात डिशवॉश लिक्विड टाकून शिट्टी धुणं फायदेशीर ठरतं. यामुळे तेलकटपणा कमी होतो.

Web Title : प्रेशर कुकर की सीटी को इन आसान टिप्स से नए जैसा चमकाएं।

Web Summary : कुकर के नियमित उपयोग से सीटी गंदी हो जाती है, जिससे दबाव निकलने में बाधा आती है। सुरक्षा और स्वच्छता के लिए नियमित रूप से साफ करें। सिरका, बेकिंग सोडा, नींबू या डिश सोप का प्रयोग करें। आसान घरेलू उपाय चमक को बहाल करते हैं।

Web Title : Clean your pressure cooker whistle like new with these simple tips.

Web Summary : Daily cooker use causes dirty whistles, hindering pressure release. Clean regularly for safety and hygiene. Use vinegar, baking soda, lemon, or dish soap. Simple home remedies restore shine effortlessly.